२ पत्नी आणि पाच लेकरांना सोडून गेला होता, ४७ वर्षांनी घरी परतल्यावर बसला त्याला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2021 14:37 IST2021-10-04T14:35:58+5:302021-10-04T14:37:31+5:30

चार दशकांपेक्षा अधिकचा काळ गायब राहिल्यानंतर जेव्हा तो आपल्या घरी परतला तेव्हा तो हैराण झाला. त्याला एक अशी बातमी मिळाली की, त्याच्या पायाखालची जमीनच सरकली.

Man returned home after 47 years found wives remarried to other men | २ पत्नी आणि पाच लेकरांना सोडून गेला होता, ४७ वर्षांनी घरी परतल्यावर बसला त्याला धक्का

२ पत्नी आणि पाच लेकरांना सोडून गेला होता, ४७ वर्षांनी घरी परतल्यावर बसला त्याला धक्का

एक व्यक्ती ३७ वयाचा असताना अचानक गायब झाला. त्याला दोन पत्नी आणि पाच अपत्य होती. चार दशकांपेक्षा अधिकचा काळ गायब राहिल्यानंतर जेव्हा तो आपल्या घरी परतला तेव्हा तो हैराण झाला. त्याला एक अशी बातमी मिळाली की, त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. चला जाणून घेऊ काय आहे भानगड....

ही घटना आहे केनियातील काकामेगाची. येथील एका व्यक्तीची अनोखी कहाणी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. डेली स्टारच्या वृत्तानुसार, पीटर ओयूका ४७ वर्षानंतर आपल्या घरी परतला. तो परत आला तेव्हा त्याचं वय ८४ वर्षे झालं होतं. 

ओयूका १९७४ मध्ये अचानक गायब झाला होता. त्यावेळी त्याचं वय ३७ वर्षे होतं. त्याच्या दोन पत्नी आणि मुले तो गेल्यावरर परेशान झाले होते. या दरम्यान त्याने गावातील लोकांना सूचना दिली की, तो कामाच्या शोधात जात आहे. पण त्याने परिवाराला याबाबत काहीच माहिती दिली नाही.

पीटर ओयूकाने स्थानिक मीडियाला सांगितलं की, तो १९८३, १९९२ आणि १९९६ मध्ये आपल्या गावात परतला होता. पण काही कारणांमुळे तो त्याच्या घरी जाऊ शकला नाही. पण जेव्हा ४७ वर्षानंतर आपल्या घरी परतला तेव्हा त्याचं विश्व बदललेलं होतं. कारण ओयूकाच्या दोन्ही पत्नींनी दुसऱ्या पुरूषांसोबत लग्न केलं होतं. 

ओयूकाने सांगितलं की, तो ४७ वर्ष तंजानियामध्ये होता. तो तिथे एका महिलेसोबत नात्यात होता. दोघांना एक मुलही आहे. पण जेव्हा त्या महिलेसोबत सगळे संबंध तोडून तो आपल्या घरी परतला तेव्हा तो निराश झाला. कारण त्याच्या दोन्ही पत्नींनी दुसऱ्या पुरूषांसोबत लग्न केलं होतं.
 

Web Title: Man returned home after 47 years found wives remarried to other men

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.