घरी सुरू होतं मुलाच्या तेराव्याचं जेवण अन् अचानक तो समोर येऊन उभा राहिला...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2019 02:31 PM2019-09-13T14:31:53+5:302019-09-13T14:34:54+5:30

तुम्हीही अनेकदा ऐकलं असेल की, मृत म्हणून घोषित केलेली व्यक्ती काही दिवसांनी किंवा वर्षांनी घरी परतली किंवा असेही ऐकले असेल की, मृत्युशय्येवर असलेली व्यक्ती पुन्हा जिवंत झाली.

Man returns when his family did his last Creamation | घरी सुरू होतं मुलाच्या तेराव्याचं जेवण अन् अचानक तो समोर येऊन उभा राहिला...

घरी सुरू होतं मुलाच्या तेराव्याचं जेवण अन् अचानक तो समोर येऊन उभा राहिला...

Next

तुम्हीही अनेकदा ऐकलं असेल की, मृत म्हणून घोषित केलेली व्यक्ती काही दिवसांनी किंवा वर्षांनी घरी परतली किंवा असेही ऐकले असेल की, मृत्युशय्येवर असलेली व्यक्ती पुन्हा जिवंत झाली. अशीच एक विचित्र घटना बिहारच्या मुजफ्फरपूरमधून समोर आली आहे. इथे एक तरूण घरी परत आला, मात्र तेव्हा त्याच्या घरचे लोक त्याच्या तेराव्याची तयारी करत होते. अशात तरूणाला पाहून घरातील सगळेच हैराण झाला आणि तरूणाची परत आल्याची बातमी गावात वाऱ्याच्या वेगाने पसरली. 

मुजफ्फरपूर जिल्ह्यातील बुधनगरा गावात राहणारा संजीव कुमार २५ ऑगस्टला बेपत्ता झाला होता. त्यानंतर काही दिवसांनी गंडक नदीच्या किनाऱ्यावर एक मृतदेह सापडला. हा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला. नंतर संजीवचे वडील रामसेवक हॉस्पिटलमध्ये गेले आणि त्यांनी हा मृतदेह त्यांच्या मुलाचा असल्याचा दावा केला.

संजीव कुमारच्या परिवारातील लोकांनी संपूर्ण रिवाजानुसार मृतदेहावर अंत्यसंस्कार केले होते. त्यानंतर संजीव कुमारच्या घरी जेव्हा तेराव्याच्या श्राद्ध भोजनाची तयारी सुरू होती, तेव्हा अचानक तो परत आला. संजीवला असं पाहून सगळे हैराण झाले. नंतर गावातील लोकांनीही त्याला बघण्यासाठी गर्दी केली.

संजीव कुमारचे वडील रामसेवक ठाकूर यांनी सांगितले की, २५ ऑगस्टला माझा मुलगा बेपत्ता झाला होता आणि याची पोलिसांनाही माहिती दिली होती. नंतर मला एका अज्ञात मृतदेहाबाबत माहिती मिळाली. तेव्हा मी दावा केला की, हा माझा मुलगा आहे. आम्ही त्यावर अंत्यसंस्कार केले. पण आता मला आनंद आहे की, माझा मुलगा परत आलाय.

Web Title: Man returns when his family did his last Creamation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.