४ वर्षांचा असताना झाला होता किडनॅप, ३३ वर्षांनी आईला भेटला; कशी झाली भेट वाचून व्हाल अवाक्
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2022 05:05 PM2022-01-03T17:05:08+5:302022-01-03T17:08:58+5:30
China : १९८९ मध्ये हेनान प्रांतात ४ वर्षीय ली जिंगवेईला एका व्यक्तीने चाइल्ड ट्रॅफिकिंगसाठी किडनॅप केलं होतं. या व्यक्तीने १९०० किलोमीटर दूर जाऊन गुआंगडोंग प्रांतात जिंगवेईला एका दाम्पत्याला विकलं होतं.
चीनचा (China) राहणारा ली जिंगवे ३३ वर्षाआधी बालपणी किडनॅप झाला होता. पण आता तीस वर्षांनंतर जिंगवेई आपल्या आईला पुन्हा भेटला. कारण त्याने त्याच्या स्मरणशक्तीच्या जोरावर आपल्या गावाचा नकाशा बनवला आणि तो सोशल मीडियावर शेअर केला. या माध्यमातून तो पुन्हा आपल्या परिवाराला भेटू शकला.
'डेलीमेल'च्या रिपोर्टनुसार, १९८९ मध्ये हेनान प्रांतात ४ वर्षीय ली जिंगवेईला एका व्यक्तीने चाइल्ड ट्रॅफिकिंगसाठी किडनॅप केलं होतं. या व्यक्तीने १९०० किलोमीटर दूर जाऊन गुआंगडोंग प्रांतात जिंगवेईला एका दाम्पत्याला विकलं होतं. बराच शोध घेऊनही त्याचा काहीच पत्ता लागला नव्हता. पण आता ३३ वर्षानंतर जिंगवेई आपल्या हाताने तयार केलेल्या नकाशाच्या मदतीने आपल्या परिवाराकडे परत आला आहे. ३३ वर्षानंतर आपल्या घरी परत आल्यावर जिंगवेई आपल्या आईला भेटला तेव्हा दोघांच्या डोळ्यात अश्रू होते. ४ वर्षांचा असताना गायब झालेला जिंगवेईचं आता लग्न झालंय आणि त्याला एक बाळही आहे.
कशी झाली भेट?
जिंगवेई परिवारापासून वेगळा झाल्यापासून त्याला सतत आई आणि गावाची आठवण येत होती. तो दिवसातून एकदा त्याच्या गावाचा नकाशा नक्की बनव होता. जेणेकरून त्याला आठवण रहावी. थोडा मोठा झाल्यावर त्या दाम्पत्यालाही विनंती केली की, त्याला त्याच्या गावी न्यावं आणि आईची भेट घडवून आणावी. पण त्यांनी तसं केलं नाही. अशात जिंगवेईने गावाचा नकाशा तयार केला.
हा नकाशा तंतोतत त्याच्या गावासारखाच होता. कुणाच्यातरी सांगण्यावरून जिंगवेईने तो नकाशा इंटरनेटवर अपलोड केला. सोबतच स्वत:ची चाइल्ड ट्रॅफिकिंगची शिकार झाल्याची कहाणीही त्याने नकाशासोबत अटॅक केली. पाहता पाहता त्याची कहाणी व्हायरल झाली.
हे प्रकरण पोलिसात गेलं तेव्हा जिंगवेईची आणि त्याच्या आईची भेट घडवण्याचा पोलिसांनी निश्चय केला. त्यांनी त्याच्या नकाशाची तुलना मिलानच्या डोंगरांमध्ये असलेल्या एका गावासोबत केली. त्या गावापर्यंत पोहोचल्यानंतर डीएनए रिपोर्टच्या आधारारे जिगंवेईच्या आईचा पत्ता लागला. नव्या वर्षाच्या दिवशी ३३ वर्षांनी आई आणि मुलाची भेट झाली. यावेळी दोघेही फार भावूक झाले होते.