"पैसाच सर्व काही नाही" अब्जाधीश आई-वडिलांचा दत्तक मुलगा घर सोडून निघून गेला कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2023 12:33 PM2023-02-10T12:33:38+5:302023-02-10T12:34:46+5:30

मेई आता त्याच्या खऱ्या कुटुंबात परतला आहे, त्य़ाला कळते की त्याला एक मोठी बहीण आणि दोन लहान भाऊ आहेत.

man reunited with real multimillionaire parents after 25 years of abduction china | "पैसाच सर्व काही नाही" अब्जाधीश आई-वडिलांचा दत्तक मुलगा घर सोडून निघून गेला कारण...

फोटो - आजतक

Next

लहानपणी अपहरण झालेला एक व्यक्ती वयाच्या 27 व्या वर्षी त्याच्या खऱ्या पालकांकडे परतला. त्याला अब्जाधीश पालकांनी दत्तक घेतले होते. पण तरुण म्हणतो, पैसाच सर्वस्व नाही. त्याचे खरे पालक देखील खूप श्रीमंत आहेत. तो दोन वर्षांचा असताना त्याचं अपहरण झालं होतं. मेई झिकियांग असं या व्यक्तीचं नाव आहे. तो चीनचा रहिवासी असून खऱ्या कुटुंबात परतल्यानंतर तो पहिल्यांदाच या विषयावर उघडपणे बोलला. "पैशाने आनंद विकत घेता येत नाही" असं त्याने एका मुलाखतीत म्हटलं आहे. 

साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, मेई 1997 मध्ये 28 महिन्यांचा होता, जेव्हा त्याचे चीनच्या युनान प्रांतातून अपहरण करण्यात आले होते. तो त्याच्या घराबाहेर खेळत होता. बेपत्ता झाल्याचे त्याच्या पालकांना समजल्यानंतर त्यांनी त्याचा शोध सुरू केला. गेले कित्येक वर्षे त्याचे पालक त्याचा खूप शोध घेत होत. गेल्या वर्षी जूनमध्ये हा शोध संपला जेव्हा त्याच्या एका मित्राने त्याला मेईची डीएनए चाचणी करण्यास सांगितले. या मित्राचा मुलगाही 12 वर्षांपूर्वी बेपत्ता झाला होता. मेई त्याच्या दत्तक कुटुंबासोबत राहत होता.

मेईने सांगितले की, मानवी तस्करांनी त्याला एका कुटुंबाला विकले होते. तो अतिशय बारीक आणि लहान असल्याने या कुटुंबाने त्याला एका श्रीमंत कुटुंबाच्या स्वाधीन केले. ज्यांनी त्यांची काळजी घेतली. मेई म्हणते की तिच्या दत्तक पालकांना आधीच तीन मुले होती. दोन मुली त्याच्यापेक्षा मोठ्या होत्या आणि एक मुलगा त्याच्यापेक्षा लहान होता. तो त्यांचा खरा मुलगा नाही असे त्याला नेहमी वाटायचे. मेई म्हणतो की शाळेनंतर त्याला विद्यापीठात शिकण्याची परवानगी नव्हती. तो कुटुंबाच्याच हॉस्पिटलमध्ये कामाला जात असे.

मेई आता त्याच्या खऱ्या कुटुंबात परतला आहे, त्य़ाला कळते की त्याला एक मोठी बहीण आणि दोन लहान भाऊ आहेत. बेपत्ता असतानाही ते त्याचा वाढदिवस साजरा करायचा. केक कापायचे, पण दु:खी असल्याने खायचे नाही. त्यांना वाटायचं की तो एक दिवस नक्कीच परत येईल, म्हणून त्याच्यासाठी घरही विकत घेतलं. कुटुंबाने कधीही कोणताही सण आनंदाने साजरा केला नाही. आता मेई त्याच्या जवळच्या कौटुंबिक व्यवसायात त्याच्यासोबत काम करतो. त्यांची हॉटेल सप्लाय कंपनी आहे. तो म्हणाला की तो त्याच्या बालपणात कधीही आनंदी नव्हता. त्याच्या खऱ्या आई-वडिलांकडे आल्यानंतर त्याला अनोळखी वाटत नाही कारण तो त्याच्यावरचे त्यांचे प्रेम पाहू शकतो. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
 

Web Title: man reunited with real multimillionaire parents after 25 years of abduction china

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.