रोमँटिक डेटवर गेलेल्या तरुणाला बसला धक्का जेव्हा एंट्री झाली अनोळखी माणसाची...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2021 08:11 PM2021-12-26T20:11:36+5:302021-12-26T20:12:07+5:30
अनेक तरुण आणि तरुणी ऑनलाईन डेटिंग साईटवर (online dating site) भेटतात, ओळख होते, जुजबी गप्पा होतात आणि नंतर दोघं एकमेकांना प्रत्यक्षात भेटण्याचा निर्णय घेतात. अशाच प्रकारे एका तरुणीसोबत डेटसाठी भेटलेल्या तरुणाने त्याला आलेला भयंकर अनुभव शेअर केला आहे.
एका तरुणाची महिलेसोबत डेटिंग (date with woman) सुरू असताना अचानक एक अनोळखी व्यक्ती (strange person) टेबलवर येऊन बसली आणि सगळेच अवघडून गेले. सध्या डेटिंगचा जमाना आहे. अनेक तरुण आणि तरुणी ऑनलाईन डेटिंग साईटवर (online dating site) भेटतात, ओळख होते, जुजबी गप्पा होतात आणि नंतर दोघं एकमेकांना प्रत्यक्षात भेटण्याचा निर्णय घेतात. अशाच प्रकारे एका तरुणीसोबत डेटसाठी भेटलेल्या तरुणाने त्याला आलेला भयंकर अनुभव शेअर केला आहे.
अमेरिकेतील बोस्टनमध्ये राहणाऱ्या तरुणाची एका डेटिंग ऍपवर ओळख झाली. दोघांनी एकमेकांना भेटण्याचा निर्णय घेतला. तारीख ठरली, ठिकाण ठरलं. दोघंही एकमेकांना ठरलेल्या जागी, ठरलेल्या वेळी भेटले. गप्पा सुरू झाल्या. हळूहळू गप्पा रंगत गेल्या आणि डेट रोमँटिक होऊ लागली. दोघांनाही या डेटवर मजा येत होती. ड्रिंक्स आणि जेवण संपवून दोघांनीही सिनेमा पाहायला जाण्याचा बेत केला होता. मात्र तेवढ्यात एक विचित्र घटना घडली.
दोघांच्याही रोमँटिक गप्पा रंगात आल्या असताना अचानक एक अनोळखी पुरुष त्यांच्या टेबलवर येऊन बसला. त्याला पाहून महिलेच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. हा पुरुष नेमका कोण आहे, हे आपल्याला कळत नव्हतं. न राहवून आपण त्या व्यक्तीला त्याची ओळख विचारली. त्यावर आपण या महिलेचा पती असल्याचं त्यानं सांगितलं. हे ऐकून तरुणाला काय करावं, तेच कळेना.
तुमच्या लग्नाला किती वर्षं झाली, असा प्रश्न त्याने विचारला. त्यावर लग्नाला ७ वर्षं झाल्याचं त्यानं सांगितलं. तरुण त्याला बसलेला धक्का पचवत असतानाच आणखी एक घटना घडली. टेबलपासून काही अंतरावर उभी असणारी एक लहान मुलगी आई, आई असं ओरडत टेबलकडे धावत आली. ते पाहून तरुण इतका घाबरला की त्याने डेट सोडून सरळ तिथून पळ काढला. तरुणाने आपला अनुभव सोशल मीडियावर शेअर केला असून त्यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.