घाणेरडे कंडोम दाखवून ६३ हॉटेल्सना 'या' तरूणाने लावला चूना, वाचा कसा झाला खुलासा!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2024 02:46 PM2024-11-30T14:46:31+5:302024-11-30T14:47:48+5:30

२१ वर्षीय जियांग नावाचा तरूण हॉटेलमध्ये चेक इन करत होता. नंतर रूममध्ये मृत झुरळं, तुटलेले केस आणि घाणेरडे कंडोम जागोजागी ठेवत होता.

Man scam in 63 hotels by showing dirty condoms and hair | घाणेरडे कंडोम दाखवून ६३ हॉटेल्सना 'या' तरूणाने लावला चूना, वाचा कसा झाला खुलासा!

घाणेरडे कंडोम दाखवून ६३ हॉटेल्सना 'या' तरूणाने लावला चूना, वाचा कसा झाला खुलासा!

चीनमध्ये एका तरूणाला फसवणुकीच्या आरोपात अटक केली. त्याच्यावर हॉटेल्समध्ये जाऊन फसवणूक करण्याचा आरोप आहे. तो हॉटेल्समध्ये मोफत राहत तर होताच, सोबतच नुकसान भरपाई म्हणून पैशांची मागणीही करत होता. धक्कादायक बाब म्हणजे आतापर्यंत ६३ हॉटेल्सना त्याने चूना लावलाय. 

साऊथ चायना मॉर्निंग पोस्टनुसार, २१ वर्षीय जियांग नावाचा तरूण हॉटेलमध्ये चेक इन करत होता. नंतर रूममध्ये मृत झुरळं, तुटलेले केस आणि घाणेरडे कंडोम जागोजागी ठेवत होता. त्यानंतर तो हॉटेलच्या साफ-सफाईच्या वाईट स्थितीची तक्रार करत होता आणि याचा फायदा घेत हॉटेलच्या व्यवस्थापनाकडून पैसे लुटत होता किंवा तिथे मोफत राहत होता.

झेजियांगच्या लिनहायच्या एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, १० महिन्यादरम्यान जियांग वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये थांबला. कधी कधी एका दिवसात तीन किंवा चार वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये चेक-इन करत होता. रूममध्ये स्वत:च कीटक, केस, घाणेरडे कंडोम टाकून तक्रार करत होता. इतकंच नाही तर सोशल मीडियावर हॉटेलची बदनामी करू अशी धमकीही देत होता. कोणत्या हॉटेलने पोलिसात तक्रार दिली नाही तोपर्यंत तो असं करत होता. 

जेव्हा तरूण स्वच्छतेसंबंधी आरोप लावत एका हॉटेलकडून पैसे लुटण्याचा प्रयत्न करत होता, तेव्हा त्या हॉटेलमध्ये काम करणाऱ्या एका स्टाफने त्याला ओळखलं. जियांगने आधी ज्या हॉटेलमध्ये अशी फसवणूक केली होती, तेथील स्टाफ या हॉटेलमध्ये काम करत होता. जेव्हा तरूणाने अशी तक्रार केली तेव्हा आधीच्या हॉटेलमध्येही असं झाल्याची माहिती त्याने व्यवस्थापनाकडे दिली. 

त्यानंतर सगळ्याच हॉटेल व्यवस्थापकांनी एकमेकांना संपर्क केला. तेव्हा जियांगने अनेक हॉटेल्समध्ये असंच केल्याचा खुलासा झाला. हॉटेलच्या स्टाफने सांगितलं की, तो रूममध्ये कथित कीटक आणि केसांबाबत तक्रार करत होता. त्याची पोलखोल झाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. 

जियांगला अटक केल्यानंतर हॉटेलच्या त्याच्या रूममधून २३ पॅकेट सापडले. ज्यात त्याने केस, कंडोम, कीटक अशा गोष्टी ठेवल्या होत्या. पुढील चौकशीतून समोर आलं की, गेल्या वर्षापासून तो ३०० पेक्षा जास्त हॉटेल्समध्ये थांबला होता. त्यातील ६३ हॉटेल्सना चूना लावण्यात तो यशस्वी ठरला होता. अशाप्रकारे त्याने ४.३ लाख रूपये लुटले आहे.

Web Title: Man scam in 63 hotels by showing dirty condoms and hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.