भारतीय लष्कराची क्षमता वाढवणारी देशभक्त बायको हवी; बेरोजगार तरुणाची लग्नासाठी जाहिरात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2022 09:03 AM2022-04-05T09:03:10+5:302022-04-05T09:21:08+5:30
एका बेरोजगार तरुणाला देशाची फौज वाढवणारी मुलगी हवी आहे. एका तरुणाने मुलीसाठी ठेवलेल्या अटी पाहिल्यावर तुम्हीही डोक्यावर हात माराल.
नवी दिल्ली - लग्नाबद्दल प्रत्येकानेच काही स्वप्न रंगवलेली असतात. आपला जो़डीदार नेमका कसा हवा हे मनात पक्क केलेलं असतं. काही ओळखीच्या मंडळींद्वारे लग्न जुळवली जातात. तर हल्ली एखाद्या विवाह संकेतस्थळावरून देखील असंख्य लग्न जमतात. काही जण असा मुलगा हवा किंवा अशी मुलगी हवी अशी जाहिरात देखील देतात. अशीच एक हटके घटना आता समोर आली आहे. एका बेरोजगार तरुणाला भारतीय लष्कराची क्षमता वाढवणारी देशभक्त बायको हवी आहे. एका तरुणाने मुलीसाठी ठेवलेल्या अटी पाहिल्यावर तुम्हीही डोक्यावर हात माराल.
तरुणाने लग्नासाठी मुलगी हवी म्हणून दिलेल्या या जाहिरातीची आता सर्वत्र जोरदार चर्चा रंगली असून तो फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. यामध्ये बिहारमध्ये एका डेंटिस्ट तरुणाने आपल्या जोडीदारासाठीच्या अटी दिल्या असून तो स्वत: मात्र बेरोजगार आहे. त्याला नोकरी करणारी आणि श्रीमंत बायको हवी आहे. त्यातही आपली होणारी बायको देशभक्त असायला हवी. भारतीय लष्कराची आणि स्पोर्ट्स क्षमता वाढवण्याची इच्छा तिच्यात असावी असंही म्हटलं आहे.
Dentist Abhinao Kumar is looking for a wife. Anyone interested? pic.twitter.com/x1YTLRDCkz
— Indranil (@TheBombayBombil) March 29, 2022
डॉक्टर अभिनव कुमार असं ही जाहिरात देणाऱ्याचं नाव आहे. त्याने जाहिरातीच्या सुरुवातीला थोडक्यात आपली माहिती दिली आहे. आपण बिहारमध्ये राहत असून एक डेंटिस्ट आहोत आणि सध्या आपण बेरोजगार असल्याचं त्याने या जाहिरातीत स्पष्टपणे सांगितलं आहे. त्यानंतर त्याने आपल्याला कशी नवरी हवी आहे, हे सांगितलं आहे. जाहिरातीत नमूद केल्यानुसार, "मुलगी गोरी, सुंदर, प्रामाणिक, धाडसी आणि श्रीमंत हवी. मुलांना सांभाळण्यात ती एक्सपर्ट असावी."
"मुलगी देशभक्त असायला हवी. भारतीय लष्कराची आणि स्पोर्ट्स क्षमता वाढवण्याची इच्छा तिच्यात असावी" असं म्हटलं आहे. लग्नाची ही अजब जाहिरात पाहून लोक हैराण झाले आहेत. काहींनी मजेशीर कमेंट केल्या आहेत. तर काहींनी संताप व्यक्त केला आहे. लग्नाचे हे असा भन्नाट किस्से नेहमीच समोर येत असतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.