प्रेयसीने दिली ती प्रेग्नंट असल्याची बातमी, ऐकल्यावर प्रियकराला बसला धक्का; म्हणाला - मी तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2023 02:49 PM2023-11-25T14:49:39+5:302023-11-25T14:50:10+5:30

या व्यक्तीला हेच कळत नाहीये की, या स्थितीत त्याची ही हालत आहे अशात त्याने काय करावं.

Man shares online confession girlfriend shares pregnancy news while he is infertile | प्रेयसीने दिली ती प्रेग्नंट असल्याची बातमी, ऐकल्यावर प्रियकराला बसला धक्का; म्हणाला - मी तर...

प्रेयसीने दिली ती प्रेग्नंट असल्याची बातमी, ऐकल्यावर प्रियकराला बसला धक्का; म्हणाला - मी तर...

अनेकदा लोकांसमोर अशी स्थिती तयार होते की, त्यांना त्यावेळी करावं काहीच कळत नाही. ना ते आनंदी होऊ शकतात ना त्यांना दु:खी होता येत. सोशल मीडियावर एका व्यक्तीने त्याच्यासमोर आलेल्या अशाच स्थितीबाबत सांगितलं आहे. त्याला हेच कळत नाहीये की, या स्थितीत त्याची ही हालत आहे अशात त्याने काय करावं. त्याची प्रेयसी आई बनणार आहे. पण जेव्हा तिने त्याला हे सांगितलं त्याला मोठा धक्का बसला.

कोणत्याही व्यक्तीसाठी वडील होणं ही मोठी आनंदाची बाब असते. या जगात असं कुणीतरी येणार जे त्याला बाबा म्हणेल. पण ही बातमी या व्यक्तीसाठी मोठा धक्का ठरली. त्याने लोकांना सोशल मीडियावर सल्ला मागितला आहे की, त्याने या स्थितीत काय करायला हवं? झालं असं की, या व्यक्तीची प्रेयसी गर्भवती आहे. तिने त्याला ही आनंदाची बातमी दिली. पण या व्यक्तीला या आनंदाच्या बातमीचं दु:खं वाटलं. कारण त्याला हे माहीत आहे की, तो वडील बनू शकत नाही.

या व्यक्तीची ही पोस्ट आतापर्यंत 40 लाख वेळा बघितली गेली आहे. त्याची स्थिती जाणून घेतल्यावर लोकांनी त्याला अनेक सल्ले दिले. एका व्यक्तीने लिहिलं की, त्याने लगेच ब्रेकअप करावं. तर काहींनी लिहिलं की, त्याने त्याच्या इनफर्टिलिटीच्या टेस्टचा रिजल्ट आपल्या प्रेयसीला ख्रिसमसला गिफ्ट म्हणून द्यावा. जेणेकरून दगा देणं काय असतं हे तिला कळेल. तेच काही लोक म्हणाले की, त्याने पुन्हा एकदा त्याची टेस्ट करावी. कदाचित बाळ त्याचंच असावं. आता यावर ही व्यक्ती काय अपडेट देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Web Title: Man shares online confession girlfriend shares pregnancy news while he is infertile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.