केस कापण्यासाठी न्हाव्याकडे गेला, बिल इतकं आलं की, लोन घ्यावं लागलं!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2023 05:19 PM2023-06-12T17:19:48+5:302023-06-12T17:20:20+5:30
तुम्ही हे कधी ऐकलं नसेल की, केसांची ट्रीटमेंट केल्याचं बिल भरण्यासाठी कुणी लोन घेतलं असेल. आज अशाच एका व्यक्तीची कहाणी आम्ही सांगणार आहोत.
Man Took Haircut Worth 1 Lakh: तुम्ही अनेक लोकांना केसांवर ट्रीटमेंट करताना पाहिलं असेल आणि बरेच लोक मोठ्या गर्वाने सांगतात की, त्यांनी त्यांच्या केसांसाठी हजारो रूपये खर्च केला. पण तुम्ही हे कधी ऐकलं नसेल की, केसांची ट्रीटमेंट केल्याचं बिल भरण्यासाठी कुणी लोन घेतलं असेल. आज अशाच एका व्यक्तीची कहाणी आम्ही सांगणार आहोत.
ही घटना आहे चीनमधील. इथे एका व्यक्ती केस कापण्यासाठी सलूनमध्ये गेली होती. इथे त्याच्यासोबत असं काही झालं की, 250 रूपयांच्या हेअरकटसाठी त्याच्यासमोर चक्क 1 लाख 14 हजार रूपयांचं बिल ठेवण्यात आलं. हे बिल बघताच त्याचं डोकं चक्रावलं. त्याने स्पष्ट सांगितलं की, त्याच्याकडे इतके पैसे नाही. त्यानंतर जे झालं ते वाचून तुम्ही हैराण व्हाल.
साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, जेंगजियांग प्रांतात ही व्यक्ती राहत होती. ती एका रेस्टॉरन्टमध्ये वर्कर म्हणून काम करत होती. त्याला एका मित्राने 20 युआन म्हणजे 250 रूपयांचं एक गिफ्ट कार्ड दिलं होतं. जे बीजिक्सिंग हेअर सलूनचं होतं. हे कार्ड बेसिक हेअरकटसाठी वापरलं जाऊ शकत होतं. जेव्हा व्यक्ती सलूनमध्ये गेली तेव्हा त्याला सांगण्यात आलं की, हेअरकटच्या आधी त्याला हेड मसाज देण्यात येईल. त्यानंतर 500 रूपयांचं एक फेसपॅक लावलं जाणार. यादरम्यान त्याला एक 5000 युआन म्हणजे 57 हजार रूपयांचं एक गिफ्ट कार्डही खरेदी करण्यास सांगण्यात आलं.
यावेळी व्यक्तीचा चष्मा काढण्यात आला होता. अशात त्याला प्राइस लिस्ट दिसली नाही. केल कापल्यानंतर त्याला बिल आणि कोट बघण्यास सांगण्यात आलं. पण व्यक्तीने इग्नोर केलं. यानंतर त्याच्या डोक्यावर अनेक प्रकारचे प्रोडक्ट लावण्यात आले. ज्यामुळे खर्च गिफ्ट कार्डच्या वर गेला. जेव्हा त्याने सांगितलं की, त्याच्याकडे पैसे नाहीत तेव्हा सलूनकडून त्याचा मोबाइल घेऊन त्याला 57 हजार रूपयांचं लोन देण्यात आलं आणि त्यातून बिल वसूल करण्यात आलं. व्यक्ती म्हणाली की, घाबरल्यामुळे तो काहीच बोलू शकला नाही. नंतर त्याने पैसे परत मिळवण्यासाठी मीडियाची मदत मागितली.