नाश्ता करत असताना अचानक शिंकला, झालं असं काही ज्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2024 03:55 PM2024-06-08T15:55:47+5:302024-06-08T15:56:05+5:30
63 वर्षीय व्यक्ती पत्नीसोबत अमेरिकेच्या फ्लोरिडामधील एका हॉटेलमध्ये बसून होती. त्याला खोकला आणि शिंक एकाचवेळी आली.
शिंका येणं ही एक कॉमन बाब आहे. कधी सर्दीमुळे तर कधी धुळीमुळे तर कधी एखाद्या गोष्टीच्या अॅलर्जीमुळे शिंका येतात. कुणी हळूच शिंकतं तर काही लोकांना जोरात शिंक येते. पण शिकणं कधी नुकसानकारकही ठरू शकतं. एक व्यक्ती पत्नीसोबत बसून नाश्ता करत होती. यावेळी त्याला शिंक आली. शिंकण्यामुळे त्याच्या पोटावर दबाव पडला आणि बरी झालेली जखम उसवली आणि त्यातून मोठी आतडी बाहेर आली.
63 वर्षीय व्यक्ती पत्नीसोबत अमेरिकेच्या फ्लोरिडामधील एका हॉटेलमध्ये बसून होती. त्याला खोकला आणि शिंक एकाचवेळी आली. नंतर त्याला अचानक पोटाजवळ ओलसर जाणवलं. नंतर त्याला वेदनाही झाल्या. जेव्हा त्याने शर्ट वर करून पाहिलं तर त्याची मोठी आतडी सर्जरीच्या जुन्या बरी झालेल्या जखमेतून बाहेर आली होती. या व्यक्तीवर काही महिन्यांआधी पोटावर सर्जरी करण्यात आली होती. डॉक्टरांनी जखम बरी झाल्याचंही सांगितलं होतं.
लगेच त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी पाहिलं तर त्यांना तीन इंचाचं छिद्र दिसलं ज्यातून मोठी आतडी बाहेर आली होती. सुदैवाने जास्त रक्त गेलं नाही आणि मोठं नुकसानही झालं नाही. सर्जरी करून आतडी पुन्हा पोटात टाकण्यात आली.
हॉस्पिटलमध्ये सहा दिवस राहिल्यानंतर आता ही व्यक्ती घरी परतली आहे आणि बरीही झाली आहे. या केसबाबत अमेरिकन जर्नल ऑफ मेडिकलमध्ये छापण्यात आलं आहे. असं मानलं जातं की, कधी कधी कंडिशन डिहिसेंस होते, ज्यात सर्जरीची जखम पुन्हा उघडली जाते.
असं पोट आणि पेल्विक सर्जरी करणाऱ्या १०० पैकी तीन लोकांमध्ये होतं. ही समस्या वृद्ध रूग्णांमध्ये अधिक होते. ज्यात दिवशी या रूग्णाच्या पोटातून आतडी बाहेर आली होती त्याच दिवशी सकाळी डॉक्टरांनी त्यांचे टाके काढले होते.