तब्बल १० वर्षांपासून पार्श्वभागात होत होत्या वेदना, एक्स-रे पाहून डॉक्टरसोबत रूग्णही हैराण...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2019 11:43 AM2019-08-29T11:43:54+5:302019-08-29T11:48:23+5:30

५५ वर्षाच्या एका व्यक्तीला १० वर्षांपासून पार्श्वभागात वेदना होत होती. सर्वात जास्त वेदना तेव्हा व्हायची, जेव्हा ही व्यक्ती जॉगिंग करत असे.

Man somehow lives with eight metal needles stuck in his behind for 10 years | तब्बल १० वर्षांपासून पार्श्वभागात होत होत्या वेदना, एक्स-रे पाहून डॉक्टरसोबत रूग्णही हैराण...

तब्बल १० वर्षांपासून पार्श्वभागात होत होत्या वेदना, एक्स-रे पाहून डॉक्टरसोबत रूग्णही हैराण...

Next

चीनमध्ये एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. इथे ५५ वर्षाच्या एका व्यक्तीला १० वर्षांपासून पार्श्वभागात वेदना होत होत्या. सर्वात जास्त वेदना तेव्हा व्हायच्या, जेव्हा ही व्यक्ती जॉगिंग करत असे. मात्र, काही दिवसांपूर्वी हुनान प्रांतातील एका डॉक्टरांनी जेव्हा या वेदनेचं कारण शोधलं तेव्हा तेही हैराण झाले. या व्यक्तीच्या पार्श्वभागात खोलवर ८ सुया घुसलेल्या होत्या.

चीनमधील या व्यक्तीचं नाव आहे चेन. त्यांनी सांगितले की,  साधारण १० वर्षांपासून त्यांना सतत पार्श्वभागात वेदना होत होत्या. पण कामाच्या व्यस्ततेमुळे ते कधीही डॉक्टरकडे चेकअपसाठी गेले नाही. सुरूवातीला केवळ काहीतरी रूतल्यासारखं वाटत होतं. नंतर पार्श्वभागात नेहमी सेंसेशन राहत होतं. शेवटी स्थिती अधिक गंभीर झाली तेव्हा ते गेल्या महिन्यात डॉक्टरांकडे पोहोचले.

डॉक्टरांनी चेकअप केल्यावर सुरूवातील काही लक्षात आलं नाही. अशात एक्स-रे काढण्याचा सल्ला देण्यात आला. जेव्हा रिपोर्ट आला तेव्हा चेनसोबतच डॉक्टरही हैराण झाले. चेनच्या पार्श्वभागात ८ सुया घुसलेल्या होत्या. या सुया कपड्यांवर डिझाइन करण्याच्या सुया होत्या. डॉक्टरांनी सांगितले की, आत अ‍ॅक्टिव मसल्समध्ये सुया घुसलेल्या होत्या. त्यामुळे चेन जेव्हाही पायांची स्ट्रेचिंग करत होते, तेव्हा त्यांना अधिक वेदना होत होती.

जेव्हा डॉक्टरांनी चेन विचारले की, काही घडलं होतं का? यावर चेन म्हणाले की, '१० वर्षांआधी मी कचऱ्याच्या एका ढिगाऱ्यावर पडलो होतो. त्यावेळी सुया माझ्या पार्श्वभागात रूतल्या होत्या. मी स्वत: सुया काढल्या होत्या. मला वाटले की, मी सर्वच सुया काढल्या असाव्यात. पण आता लक्षात आले की, ८ सुया आतच राहिल्या होत्या'.

डॉक्टरांनी सर्जरी करून या सुया काढल्या. सोबतच सुयांचा फोटोही समोर आला आहे. यातील काही सुया जाड आहेत. सोशल मीडियात ही घटना चांगलीच व्हायरल होत आहे. पण यूजर्स हैराण झाले की, १० वर्ष डॉक्टरांकडून चेकअप केल्याविना ही व्यक्ती कशी राहू शकते. असो, चेन यांची ही सर्जरी तब्बल चार तास चालली. आता त्यांना ठीक व्हायला थोडा वेळ लागणार आहे.

Web Title: Man somehow lives with eight metal needles stuck in his behind for 10 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.