गर्लफ्रेंड बनण्याच्या नोकरीसाठी मिळतात तिला 3 कोटी, काम केवळ फिरणं, सोबत राहणं

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2023 11:46 AM2023-12-15T11:46:30+5:302023-12-15T11:46:59+5:30

25 वर्षीय येलेना लाला (Yelena Lala) ने तिच्यासाठी वेगळंच करिअर निवडलं आहे. तशी तर तरूणी चांगली शिकलेली आहे.

Man spends nearly 3 crore on girlfriend just to keep her along stay at home girlfriend job | गर्लफ्रेंड बनण्याच्या नोकरीसाठी मिळतात तिला 3 कोटी, काम केवळ फिरणं, सोबत राहणं

गर्लफ्रेंड बनण्याच्या नोकरीसाठी मिळतात तिला 3 कोटी, काम केवळ फिरणं, सोबत राहणं

आपण सध्या 21व्या शतकात जगत आहोत आणि जगात महिलांची स्थिती बरीच बदलली आहे. मुली आता आधीसारखा मागे नाहीत त्या शिक्षण घेऊन नोकरी करतात, मोठं यश मिळवतात. मुलांच्या खांद्याला खांदा लावून त्या कामे करत आहेत. जास्तीत जास्त महिला आर्थिक रूपाने आत्मनिर्भर झाल्या आहेत. अशात जर आम्ही तुम्हाला एका अशा तरूणीबाबत सांगितलं जी तिचा खर्च केवळ बॉयफ्रेंडकडून करवून घेते. 

न्यूयॉर्क पोस्टच्या एका रिपोर्टनुसार, 25 वर्षीय येलेना लाला (Yelena Lala) ने तिच्यासाठी वेगळंच करिअर निवडलं आहे. तशी तर तरूणी चांगली शिकलेली आहे. पण स्वत:हून एक पैसाही खर्च करत नाही आणि आपले सगळे बिल्स बॉयफ्रेंडला भरायला लावते. तिचं मत आहे की, तिला काही चिंता करायची नाहीये आणि सगळे बिल्स बॉयफ्रेंडला भरायला लावते.

येलेना लाला (Yelena Lala) ने आपल्या बॉयफ्रेंडचं नाव तर सांगितलं नाही, पण ती म्हणाली की, त्याचं वय 34 वर्षे आहे आणि तो न्यूयॉर्कच्या एका टेक इंडस्ट्रीत काम करतो. नुकताच तिला भेटण्यासाठी प्रायव्हेट जेटने आला होता. त्यांचं बोलणं सप्टेंबर 2020 पासून सुरू झालं होतं आणि तेव्हापासून तो तिचा सगळा खर्च करतो. दोघे सोबत फिरायलाही जातात आणि आतापर्यंत 55 देशांचा प्रवास केला आहे. 

येलेना सांगते की, ती कोणतंही काम करत नाही. पण स्वत:ला व्यस्त ठेवण्यासाठी आरामात झोपते आणि उठते. तिचं मत आहे की, तिला नेहमीच आरामाचं जीवन जगायचं होतं. महिलांची काळजी घेणं पुरूषांचं काम आहे. जर तो तुमच्यावर प्रेम करतो तर तो तुमची काळजी घेणार. एकूणच काय तर तिचा उद्देश लक्झरी आणि बिनधास्त लाईफ जगणं हाच आहे. पैशांचा विचार न करता.

Web Title: Man spends nearly 3 crore on girlfriend just to keep her along stay at home girlfriend job

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.