तरूणाने चोरी केली Ex-गर्लफेंडच्या आईची राख, मग केलं हे काम...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2022 05:35 PM2022-10-17T17:35:09+5:302022-10-17T17:35:28+5:30

डेली स्टारमधील रिपोर्टनुसार, आपल्या  एक्स-गर्लफ्रेंडच्या आईची राख चोरी करणाऱ्या व्यक्तीचं नाव जॅक्सन आहे. त्याचं वय 19 आहे.

Man stole ashes of ex girlfriends mother to sell for heroin | तरूणाने चोरी केली Ex-गर्लफेंडच्या आईची राख, मग केलं हे काम...

तरूणाने चोरी केली Ex-गर्लफेंडच्या आईची राख, मग केलं हे काम...

Next

Ashes Stealing Case:  अमेरिकेतून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. इथे एका तरूणाने त्याच्या  एक्स-गर्लफ्रेंडच्या आईची राख चोरी केली. जी तरूणीने तिच्या आईच्या अंत्यसंस्कारानंतर आपल्या घरात ठेवली होती. हैराण करणारी बाब ही आहे की, तरूणाने स्वत: त्याच्या  एक्स-गर्लफ्रेंडला याची माहिती दिली की, त्याने तिच्या आईची राख चोरी केली आहे. तरूणाने सांगितलं की, त्याने त्याच्या  एक्स-गर्लफ्रेंडच्या आईची राख ड्रग्सच्या बदल्यात विकण्यासाठी चोरी केली होती. पण अजून हे स्पष्ट झालं नाही की, राखेच्या बदल्यात त्याला पैसे किंवा ड्रग्स का मिळेल.

डेली स्टारमधील रिपोर्टनुसार, आपल्या  एक्स-गर्लफ्रेंडच्या आईची राख चोरी करणाऱ्या व्यक्तीचं नाव जॅक्सन आहे. त्याचं वय 19 आहे. जॅक्सनने सकाळी 5 वाजून 40 मिनिटांनी आपल्या  एक्स-गर्लफ्रेंडला फोन करून सांगितलं की, त्याने तिच्या आईची राख चोरी केली आहे. ही घटना अमेरिकेच्या साऊथ कॅरोलिनामधील आहे.

तरूणाने  एक्स-गर्लफ्रेंडच्या आईची राख चोरी केल्याचं समजताच तरूणीसहीत पोलिसही हैराण झाले. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, इतक्या दिवसांच्या नोकरीत त्याने राख चोरी केल्याची घटना पहिल्यांदा ऐकली.

जॅक्सनने  एक्स-गर्लफ्रेंडला फोन करून सांगितलं की, जेव्हा ती तिच्या मैत्रिणीच्या घरी गेली होती तेव्हा तो तिच्या घरात शिरला आणि त्याने तिच्या आईची राख चोरी केली. पोलिसांनी कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. 

तरूणीने पोलिसांना सांगितलं की, जेव्हा ती तिच्या मैत्रिणीच्या घरून परत येत होती तेव्हा तिला घरात शिरताच धक्का बसला. कारण मागचा दरवाजा तुटलेला होता. त्याशिवाय तिच्या घरातील वस्तू फेकलेल्या होत्या. 

Web Title: Man stole ashes of ex girlfriends mother to sell for heroin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.