जेवण करताना घशात होत होत्या वेदना, डॉक्टरांनी एक्स-रे काढला तर बसला धक्का...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2024 01:22 PM2024-03-05T13:22:09+5:302024-03-05T13:23:35+5:30

सिंगापूरच्या टॅन टॉक सेंग हॉस्पिटलमधील ही घटना आहे. डॉक्टरांनी सांगितलं की, 55 वर्षीय या व्यक्तीने जिवंत ऑक्टोपस गिळला होता.

Man struggling to eating food after swallow an octopus | जेवण करताना घशात होत होत्या वेदना, डॉक्टरांनी एक्स-रे काढला तर बसला धक्का...

जेवण करताना घशात होत होत्या वेदना, डॉक्टरांनी एक्स-रे काढला तर बसला धक्का...

घशात जर वेदना होत असेल तर जराही वेळ न घालवता डॉक्टरांकडे जायला पाहिजे. असं केलं नाही तर तुम्हाला महागात पडू शकतं. असंच एका व्यक्तीला दुर्लक्ष करणं महागात पडलं. त्याने काहीतरी खाल्लं आणि घशात वेदना होऊ लागली होती. नंतर त्याने वेदना दूर करणारं औषध खाल्लं. त्यानंतर त्याच्या पोटात दुखू लागलं होतं. तसेच त्याला जेवण गिळण्यासही समस्या होऊ लागली होती. तेव्हा तो डॉक्टरांकडे गेला. तेव्हा त्यांना त्याच्या घशात 8 पाय असलेला जीव दिसला. जो जिवंत होता. जे बघून डॉक्टरही हैराण झाले.

मिररच्या रिपोर्टनुसार, सिंगापूरच्या टॅन टॉक सेंग हॉस्पिटलमधील ही घटना आहे. डॉक्टरांनी सांगितलं की, 55 वर्षीय या व्यक्तीने जिवंत ऑक्टोपस गिळला होता. त्यावेळी जेव्हा वेदना झाल्या तेव्हा कुणाला सांगितलं नाही. त्याला वाटलं लोक त्याची खिल्ली उडवतील. पण ऑक्टोपस त्याच्या घशात जाऊन अडकला होता. त्यानंतर त्रास आणखी वाढला.

जेव्हा ऑक्टोपस घशात पोहोचला तेव्हा त्याने अन्ननलिका बंद केली. त्यामुळे पोटात अन्न जाणं पूर्णपणे बंद झालं. तेच ऑक्टोपस ते अन्न खात होता. अशात त्याच्या घशात काही जखमाही झाल्या होत्या. डॉक्टरांनी जेव्हा स्कॅन केलं तर तेही हैराण झाले. इतके दिवस ऑक्टोपस त्याच्या पोटात जिवंत होता.

नंतर डॉक्टरांनी सर्जरी करून त्याला बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. 2 दिवसांनंतर हा रूग्ण आपल्या घरी जाऊ शकला. ही काही अशी पहिली घटना नाही याआधी एका व्यक्तीने आपला मोबाइल गिळला होता. सहा महिने मोबाइल त्याच्या पोटात होता. जेव्हा पोटात दुखलं तेव्हा तो हॉस्पिटलमध्ये गेला. डॉक्टरांनी एक्स-रे काढला तेव्हा त्यांना मोबाइल दिसला. 

तेव्हाही या व्यक्तीने त्याची लोक खिल्ली उडवतील म्हणून कुणाला सांगितलं नाही. डॉक्टरांनुसार, घशात काहीतरी अडकण सामान्य बाब आहे. 80 ते 90 टक्के केसेस ठीक होतात. पण 10 ते 20 टक्के केसेसमध्ये एंडोस्कोपी करावी लागते. 1 टक्के केसेस अशा असतात ज्यात सर्जरी करावी लागते.

Web Title: Man struggling to eating food after swallow an octopus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.