बोंबला! कोरोनाची लस घ्यायला आलेल्या तरूणालाच नर्सनं केलं प्रपोज; पाहा व्हायरल व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2021 03:29 PM2021-01-03T15:29:26+5:302021-01-03T15:37:48+5:30
Trending Viral News in Marathi : सोशल मीडियावर कपल्सचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
अमेरिकेत कोरोना लस घेण्याची वेळ आली तेव्हा एका नर्सने तरूणाला अनोखं सरप्राईज दिलं आहे. 31 वर्षांच्या रॉबी स्क्वायरस कोर्टेस आणि नर्स एअरिक व्हर्डरली पाच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. कोर्टेसने लस घेण्याआधीच व्हर्डरलीला लसीकरण केंद्रात लग्नासाठी प्रपोज केलं आहे. सोशल मीडियावर कपल्सचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
अलिकडेच कोर्टेसला अमेरिकेतील दक्षिण डकोटातील एका रुग्णालयात लस देण्यासाठी अपॉइंटमेंट मिळाली होती. त्यांना माहित होते की, आपला प्रियकरसुद्धा या ठिकाणी लस देण्याचे काम करत आहे. म्हणूनच त्यांनी लसीकरणाच्या दिवशी बॉयफ्रेंडला सरप्राईज देण्याचे ठरवलं.
PM मोदींच्या फॅन झाल्या आजीबाई; अन् गाणं 'अस' गायलं की जगभरात झाल्या VIRAL
सीएनएनच्या अहवालानुसार, नर्स एरिक व्हर्डरलीला याची कल्पना नव्हती की त्याची प्रेयसी लसीकरण केंद्रात येणार आहे. व्हर्डरलीने प्रस्ताव येताच लग्नाला होकार दिला. त्यानंतर होणाऱ्या नवऱ्याला कोर्टेसने लस दिली.
गे नर्सचा हॉस्पिटलच्या टॉयलेटमध्ये कोरोना रुग्णासोबत शारीरिक संबंध....
इंडोनेशियाच्या जर्कातामधून धक्कादायक घटना समोर आली होती. येथील हॉस्पिटलमध्ये एका गे नर्सने कोरोना रूग्णासोबत हॉस्पिटलच्या टॉयलेटमध्ये शारीरिक संबंध ठेवले होते. कोरोनाच्या रूग्णासोबत शारीरिक संबंध ठेवण्यादरम्यान मेल नर्सने पीपीई किटही काढले होते. याचा खुलासा सोशल मीडियाच्या माध्यमातून झाला. झालं असं की, रूग्णाने नर्ससोबतच्या व्हॉट्सअॅपवर झालेल्या चॅटींगचा स्क्रीनशॉट ट्विटरवर शेअर केला होता. यानंतर हा स्क्रीनशॉट व्हायरल झाला. ज्यावर प्रशासनाची नजर पडली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी नर्स आणि रूग्णाची चौकशी केली. दोघांनीही टॉयलेटमध्ये शारीरिक संबंध ठेवण्याची बाब मान्य केली. सोबतच मेल नर्सने सांगितले की, त्याने पीपीई किट काढली होती.
आश्चर्य! गर्भात आधीच होते जुळे बाळ, डिलीव्हरीआधीच पुन्हा प्रेग्नेंट झाली महिला...
इंडोनेशिया एक्सपॅटच्या रिपोर्टनुसार, कोविड-१९ संक्रमित व्यक्तीसोबत शारीरिक संबंध ठेवल्या प्रकरणी मेल नर्सला सस्पेंड करण्यात आलं होतं. सध्या दोघांनाही वेगवेगळं आयसोलेशनमध्ये ठेवलं आहे. दोघांचीही कोरोना टेस्ट केली आहे. दोघांवरही इंडोनेशियातील कायद्यांनुसार कायदेशीर कारवाई होऊ शकते. इंडोनेशियातील नॅशनल नर्स असोसिएशननुसार, नर्सवर लीगल चार्जेस लावण्यात आले आहेत.