धक्कादायक! 'या' व्यक्तीने गिळला जिवंत साप, मग गळा आणि जीभ पाहून डॉक्टर झाले हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2021 05:19 PM2021-09-25T17:19:41+5:302021-09-25T17:20:29+5:30

सापाने दंश मारल्याने व्यक्तीची जीभ इतकी सूजली की, जीभ तोंडातही मावत नव्हती. त्यामुळे व्यक्तीला श्वास घेण्यास  त्रास होत होता आणि यामुळेच त्याचा मृत्यू झाला.

Man swallowed live snake then died | धक्कादायक! 'या' व्यक्तीने गिळला जिवंत साप, मग गळा आणि जीभ पाहून डॉक्टर झाले हैराण

धक्कादायक! 'या' व्यक्तीने गिळला जिवंत साप, मग गळा आणि जीभ पाहून डॉक्टर झाले हैराण

Next

साप चावल्याने कुणाचाही मृत्यू होऊ शकतो. असं असूनही एका व्यक्तीने जिवंत साप गिळला. ऐकायला हे नक्कीच विचित्र वाटतं, पण खरं आहे. पण हा स्टंट या व्यक्तीला चांगलाच महागात पडला. या कारनाम्यामुळे व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे. 

आधी जिभेला मग गळ्याला दंश

रशियातील ५५ वर्षीय शेती मजूराचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओत व्यक्ती साप गिळताना दिसत आहे. Daily Star च्या रिपोर्टनुसार, व्यक्तीने साप गिळण्याआधी दोनदा प्रयत्न केला आणि तिसऱ्या प्रयत्नात तो साप गिळण्याचा प्रयत्न करत होता तेव्हाच सापाने त्याच्या जिभेवर दंश मारला. त्यानंतर साप इतक्यावर थांबला नाही तर त्याच्या गळ्यावरही दंश मारला. (हे पण वाचा : काय आहे हे Sea Cucumber ज्याची किंमत आकाशाला भिडते आणि भारतात का आहे यावर बंदी?)

तोंडाची झाली ही अवस्था

याच्या काही तासांनंतर शेतकऱ्याची हालत खराब झाली. त्यामुळे त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी सांगितलं की, सापाच्या दंशामुळे व्यक्तीला एलर्जी झाली आहे. जीभ आणि  गळ्यावर सूज आली आहे. डॉक्टरांनुसार, व्यक्तीला एनाफिलेक्टिक शॉक लागला. सापाने दंश मारल्याने व्यक्तीची जीभ इतकी सूजली की, जीभ तोंडातही मावत नव्हती. त्यामुळे व्यक्तीला श्वास घेण्यास  त्रास होत होता आणि यामुळेच त्याचा मृत्यू झाला.

रिपोर्टनुसार, या भागात स्थानिक लोकांमध्ये साप गिळण्याची प्रथा आहे. इथे कलिंगडाच्या शेतात स्टेप वायपर साप आढळतात. ते जास्त विषारी नसतात. पण व्यक्तीला नुकसान पोहोचवू शकतात. व्यक्तीच्या मृत्यूनंतर स्थानिक प्रशासनाने लोकांना आवाहन केलं आहे की, त्यांनी साप गिळंकृत करू नये. हे जीवघेणं आहे.

Web Title: Man swallowed live snake then died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.