एकाच वेळी ३५ गर्लफ्रेंड्ससोबत मजा करत होता रोमिओ; १ चूक अंगाशी आली अन् झाली पोलखोल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2021 06:00 PM2021-04-25T18:00:19+5:302021-04-25T18:20:38+5:30
Man with thirty five girlfriends : एकाचवेळी ३५ मुलींशी संबंध असल्याबद्दल पोलिसांनी त्या व्यक्तीला अटक केली. त्या व्यक्तीने सर्व महिलांना आपला वाढदिवस वेगवेगळ्या दिवशी सांगितला. हे प्रकरणही एका मनोरंजक मार्गाने उघड झाले.
अनेकांना एका गर्लफ्रेंडचे किंवा पत्नीचे लाड पुरवायचे म्हटलं तर नाकीनऊ येतात. पण विचार करा जर एखादा माणूस ३५ गर्लफ्रेंड असतानाही ३६ वी बनवण्याचा विचार करत असेल तर, तुमचा विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे. जपानमधील एक व्यक्तीनं एक दोन नाही तर तब्बल ३५ गर्लफ्रेंड्स ठेवल्या आहेत. त्याचे हेच व्यसन आता सोशल मीडियावर चर्चेचं कारण ठरलं आहे. न्यूयॉर्क पोस्टमधील वृत्तानुसार, एकाचवेळी ३५ मुलींशी संबंध असल्याबद्दल पोलिसांनी त्या व्यक्तीला अटक केली. त्या व्यक्तीने सर्व महिलांना आपला वाढदिवस वेगवेगळ्या दिवशी सांगितला. हे प्रकरणही एका मनोरंजक मार्गाने उघड झाले.
गिफ्टसच्या नादानं अपराधी बनवलं
अहवालानुसार पोलिसांनी तकाशी मियागावा या ३९ वर्षीय व्यक्तीला अटक केली. ज्याच्या ३५ गर्लफ्रेंड्स आहेत त्या माणसाला त्याच्या पहिल्या गर्लफ्रेंडने भेटवस्तू दिल्या. त्यानंतर त्याला भेटवस्तू घेण्याचा नाद लागला आणि त्यासाठी त्याने नवीन मुलींना इम्प्रेस करण्यास सुरूवात केली आणि असं करत करत ३५ गर्लफ्रेंड्स बनवल्या.
महत्त्वाचे म्हणजे त्याने आपल्या जुन्या गर्लफ्रेंड्सपैकी एकीलाही कधीच सोडलं नाही, तो सर्वांना एकत्र डेट करत असे. त्याने हे फक्त गिफ्ट मिळवण्यासाठी केले. पण यादरम्यान, त्याच्या एका चुकीमुळे पोलखोल झाली. हा तरूण पार्ट टाईम काम करायचा घरोघरी सामान विकायचा. दरम्यान हा तरूण या सर्व मुलींना मार्केटींग कंपनीच्या माध्यमातूनच भेटला.
'नाही करायची कोरोना टेस्ट, आता फोनच लावते थांब', रेल्वे स्थानकावर तरूणीचा पोलिसांना शिवीगाळ
त्या व्यक्तीने एका गर्लफ्रेंडला सांगितले की त्याचा वाढदिवस २२ फेब्रुवारीला आहे, तर दुसर्याने सांगितले की त्याचा वाढदिवस जुलैमध्ये आहे. याशिवाय त्याने तिसरीला सांगितले की त्याचा वाढदिवस एप्रिलमध्ये आहे. त्याचा वाढदिवस प्रत्यक्षात १४ नोव्हेंबरला होतो. त्याने फक्त महागड्या भेटवस्तू मिळवण्यासाठी हे केले.
७ दिवसात १७ लाख खर्च करूनही जोडपं वाचलं नाही; दीड वर्षांच्या कोरोना संक्रमित मुलानं दिला मुखाग्नी
जेव्हा त्याच्या ३५ गर्लफ्रेंड्सपैकी एकीने त्याच्यावर संशय घेतला तेव्हा हा प्रकार उघड झाला आणि तो पोलिस स्टेशनमध्ये गेला आणि त्या व्यक्तीविरूद्ध तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक करून तुरूंगात पाठविले. मियागावाने सर्व ३५ मुलींना वचन दिले होते की तो त्यांच्याशी लग्न करेल. ही व्यक्ती आता जपानी रोमियो म्हणून प्रसिद्ध होत आहे.