VIDEO : सीवर पाइपलाईनमध्ये अडकली होती व्यक्ती, बघा कसं काढलं त्याला बाहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2022 10:45 AM2022-11-12T10:45:54+5:302022-11-12T10:46:58+5:30
Sewer Pipeline Video : कथितपणे तो हा पाइप साफ करण्यासाठी आत गेला होता. पण काही मीटर आत गेल्यावर तो फसला. बचाव दल पोहोचेपर्यंत तो तिथे अडकून होता.
Sewer Pipeline Video : सोशल मीडियावर एका रेस्क्यू ऑपरेशनचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात एक व्यक्ती एका पाईपमधून काढण्यात आला. व्हिडीओमध्ये एका व्यक्तीला तुम्ही सीवर पाइपमध्ये अडकलेलं पाहू शकता. ज्याबाबत दावा केला जात आहे की, तो रशियातील सेंट पीटर्सबर्गमध्ये पुल्कोवो आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्किंगच्या खाली आहे. कथितपणे तो हा पाइप साफ करण्यासाठी आत गेला होता. पण काही मीटर आत गेल्यावर तो फसला. बचाव दल पोहोचेपर्यंत तो तिथे अडकून होता.
तुम्ही बघू शकता की, जेव्हा त्याला पाइपमधून बाहेर काढलं तेव्हा तो उघडा होता. त्याने केवळ पॅंट घातली होती. हा व्हिडीओ वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला आहे.
😄Russian fecal trap. Typical russia.
— NAFO Warrior 🇺🇦🫶 (@NAFOWarriorz) November 10, 2022
In the temporarily russian-occupied St. Petersburg, a man tried to ferret through a sewage pipe.
This happened at Pulkovo airport. The man took off everything and climbed into the sewer pipe. I guess he was going home 🤷♂️ pic.twitter.com/EdqdLFpGXS
अनेक यूजर्सने लिहिलं की, हे त्या गुहांपेक्षाही वाईट आहे ज्यांना होलमधून बाहेर पडण्यासाठी आपलं हेल्मेटही काढावं लागतं. एकाने लिहिलं की, मी याबाबत काही महिन्यांआधी पहिल्यांदा वाचलं होतं. माझा क्लस्ट्रोफोबिया एका नव्या स्तरावर पोहोचला आहे. कुणी असं का करेल?
सुदैवाने बचाव दलाचे जवान वेळीच घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मोठ्या मेहनतीने पाइपमध्ये अडकलेल्या व्यक्तीला बाहेर काढलं. त्या किती इजा झाली हे समजू शकलेलं नाही.