१३ तासांचा प्रवास करुन तो स्पायडरमॅन चित्रपट बघायला गेला पण निराश होऊन परत आला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 07:06 PM2021-12-21T19:06:07+5:302021-12-21T19:08:10+5:30

आपल्या आवडीचा स्पायडर मॅन (Spider Man Movie) सिनेमा पाहण्यासाठी तब्बल १३ तासांचा (13 hours travel) प्रवास करून गेलेल्या एका तरुणाला निराश होऊन (no tickets) परत यावं लागलं.

man travels 13 hours to watch spiderman but can't see as movie is housefull | १३ तासांचा प्रवास करुन तो स्पायडरमॅन चित्रपट बघायला गेला पण निराश होऊन परत आला

१३ तासांचा प्रवास करुन तो स्पायडरमॅन चित्रपट बघायला गेला पण निराश होऊन परत आला

googlenewsNext

आपल्या आवडीचा स्पायडर मॅन (Spider Man Movie) सिनेमा पाहण्यासाठी तब्बल १३ तासांचा (13 hours travel) प्रवास करून गेलेल्या एका तरुणाला निराश होऊन (no tickets) परत यावं लागलं. स्पायडर मॅन सिनेमाच्या निमित्तानं पुन्हा एकदा चित्रपटगृहांत गर्दी व्हायला (Crowd in theaters) सुरुवात झाली आहे. कोरोना काळात गर्दी करण्यास मनाई असल्यामुळे बंद ठेवण्यात आलेली चित्रपट गृहं जगातील वेगवेगळ्या देशांनी आता खुली करायला सुरुवात केली आहे. त्यातच जगभरात कोट्यवधी चाहते असणारा स्पायडर मॅन सिनेमा आल्यामुळे चाहत्यांची थिएटरकडे पावलं वळत आहेत. मात्र अचानक सिनेमाचे चाहते गर्दी करून लागल्यामुळे जागा अपुरी पडू लागल्याचं चित्र आहे.

इंडोनेशियात राहणाऱ्या एका व्यक्तीला स्पायडर मॅन – नो वो होम, नावाचा नव्यानं रिलिज झालेला सिनेमा पाहण्याची इच्छा होती. त्यासाठी सिनेमा रिलिज झाल्यापासून तो ते पाहण्याची तयारी करत होता. मात्र काही केल्या त्याला तिकीट मिळत नव्हतं. सगळे शोज हाऊसफुल्ल असल्यामुळे आपल्याला कधी तिकीट मिळेल, याच्या प्रतिक्षेत तो तरुण होता. एक दिवस त्याला ऑनलाईन तिकीट उपलब्ध असल्याचं दिसलं आणि स्वतःसह पाच मित्रांचं तिकीट त्याने बुक केलं. मात्र ज्या ठिकाणचं तिकीट तरुणाला मिळालं, ते ठिकाण त्याच्या घरापासून तब्बल १३ तासांच्या अंतरावर होतं.

आपल्या मित्रांसह हा तरूण त्याने ठरवलेल्या मैदानात पोहोचला, मात्र प्रत्यक्षात तिथला शो हाऊसफुल्ल झाल्याचं समजलं. त्यानंतर त्याने मित्रांसोबतच वेळ घालवण्याचा निर्णय घेतला आणि एवढा प्रवास करून आलोच आहोत, तर इथेच काही वेळ टाईमपास करण्याचा निर्णय घेतला. ज्या मैदानात हा सिनेमा होता, त्याच मैदानात त्यांनी पूर्ण दिवस घालवला.

इंडोनेशियात २००४ साली त्सुनामी आली होती. त्यावेळी थिएटरर्सचं मोठं नुकसान झालं होतं. त्या घटनेनंतर अद्यापही तिथली थिएटर्स सुरू झाली नाहीत. बंद हॉलमध्ये सिनेमा पाहणं अजूनही सुरू झालेलं नाही. त्यामुळे अजूनही खुल्या मैदानातच सिनेमा दाखवण्यात येतो.

Web Title: man travels 13 hours to watch spiderman but can't see as movie is housefull

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.