शिंक रोखण्याचा प्रयत्न केल्यावर या व्यक्तीला झालं असं काही, एक्स-रे बघून डॉक्टर हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2023 12:32 PM2023-08-16T12:32:52+5:302023-08-16T12:33:34+5:30
एका ब्रिटिश व्यक्तीने शिंक रोखून ठेवली आणि त्याला जे झालं त्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. शिंक रोखण्याच्या नादात त्या व्यक्तीच्या घशाला छिद्र पडलं.
Trending News: शिंका बऱ्याच लोकांना येतात, काही लोक शिंका बिनधास्त देतात. पण काही लोक शिंका कंट्रोल करतात. तरीही त्यांना शिंक येते. कधी कधी शिंक रोखून ठेवणं फार महागात पडू शकतं. तुम्हीही कुठे असाल तरी शिंक रोखून ठेवणं फारच नुकसानकारक ठरू शकतं. अशीच एक घटना समोर आली आहे. एका ब्रिटिश व्यक्तीने शिंक रोखून ठेवली आणि त्याला जे झालं त्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. शिंक रोखण्याच्या नादात त्या व्यक्तीच्या घशाला छिद्र पडलं.
बीएमजे केस रिपोर्ट्स व्दारे 2018 मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या रिपोर्टमध्ये त्या व्यक्तीचं वय 34 वर्ष होतं. एका वृत्तपत्राने दावा केला की, जेव्हा ही व्यक्ती हॉस्पिटलच्या आपातकालीन विभागात गेला तेव्हा तो फीट होता. त्याला जोरदार शिंक दिल्यानंतर घशात वेदना आणि आवाजात बदल वाटला.
डॉक्टरांनी जेव्हा याबाबत विचारलं तर या व्यक्तीने सांगितलं होतं की, त्याने शिंक रोखण्याचा प्रयत्न करण्यासाठी नाक दाबण्याची आणि तोंड बंद करण्याची बाब स्वीकारली. यानंतर त्याला घशात वेगळं काही जाणवलं आणि सूजही आली होती.
डॉक्टरांनुसार, 34 वर्षीय रूग्णाची कोणतीही मेडिकल हिस्ट्री नव्हती. स्टडीमध्ये सांगण्यात आलं की, या व्यक्तीला श्वासासंबंधी किंवा ताप अशी कोणतीही समस्या नव्हती. पण टेस्ट केल्यावर समजलं की, त्याच्या घशात सूज वाढली आहे. त्याचा एक्स-रे काढण्यात आला. ज्यात त्याच्या श्वासनलिकेतून हवा निघताना दिसली. या कारणाने त्याच्या घशात सूज आली होती. अशात इन्फेक्शन वाढू नये म्हणून लगेच त्याच्या सर्जरी करण्यात आली. आता त्याची स्थिती हळूहळू चांगली होत आहे.