एक मिस्ड कॉल अन् तरूणाचा 1300 किलोमीटरचा पायी प्रवास; कारण वाचून म्हणाल, क्या बात!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 05:24 PM2020-05-15T17:24:48+5:302020-05-15T17:27:38+5:30
एका तरूणाने भारीच कारनामा केलाय. तो अहमदाबाद ते बनारसपर्यंत पायी चालत गेला तेही एका मिस्ड कॉलमुळे.
प्रेमात लोक काहीही करतात हे तुम्ही अनेकदा पाहिलंही असेल आणि ऐकलंही असेल. सद्या लॉकडाऊनमुळे अनेक मजूर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हजारो किलोमीटरचा प्रवास चालत करत आहेत. अशात अहमदाबादच्या एका तरूणाने भारीच कारनामा केलाय. तो अहमदाबाद ते बनारसपर्यंत पायी चालत गेला तेही एका मिस्ड कॉलमुळे.
'द लल्लनटॉप' वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, ही कहाणी एखाद्या मजूराची नाही. तर हा तरूण त्याच्या गर्लफेन्डला भेटण्यासाठी 1300 किलोमीटरचा प्रवास करून केला. हा प्रवास त्याने पायी चालत केला. यातून हे पुन्हा एकदा बघायला मिळालं की, माणूस प्रेमात काहीही करतो.
12 मे च्या रात्रीची घटना आहे. मिर्जा मुराद पोलीस स्टेशनमध्ये एका महिलेने तिची मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी त्यानुसार तपास सुरू केला. मुलीचा मोबाइल स्ट्रेस करण्यात आला. लोकेशन बनारसमधीलच लंका परिसरातील दाखवलं. पोलीस तिथे पोहोचले. तेव्हा त्यांना कळालं की, मुलगी तिच्या मर्जीने बॉयफ्रेन्डला तिथे भेटण्यासाठी गेली होती.
पोलीस अधिकारी सुनील दत्त यांनी सांगितले की, 'मुलीची चौकशी केल्यावर तिने सांगितले की, मुलगा तसा मूळचा बनारसचाच आहे, पण अहमदाबादमध्ये राहून काम करत होता. चार-पाच महिन्यांपूर्वी एका मिस्ड कॉलच्या माध्यमातून दोघांची ओळख झाली होती. नंतर दोघांनी भेटण्याचा प्लॅन केला. पण लॉकडाऊन सुरू झालं. तरूणाला तरूणीला भेटायला यायचं होतं. पण त्याला ना गाडी मिळाली ना ट्रेन. मग काय तो पायी निघाला. तरूणीही त्याला भेटण्यासाठी गेली'.
सुनील दत्त यांनी सांगितले की, पोलिसांनी तरूण-तरूणीला विचारपूस केल्यावर त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. दोघेही वयस्क आहेत. तरूणाला पोलिसांनी सोडून दिलं तर तरूणीला तिच्या परिवाराकडे पाठवण्यात आलंय.