कुत्र्याला फिरवायला निघाला होता, रस्त्यात सापडली कोट्यावधी वर्ष जुनी वस्तू आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2024 01:15 PM2024-03-06T13:15:42+5:302024-03-06T13:16:24+5:30

डेमियन बोशेटो नावाच्या व्यक्तीला 2022 सालात 7 कोटी वर्ष जुनी एक वस्तू सापडली. जी दिसायला फार विशाल होती.

Man walking his dog discovered 7 crore years old dinosaur skeleton fossil fuels | कुत्र्याला फिरवायला निघाला होता, रस्त्यात सापडली कोट्यावधी वर्ष जुनी वस्तू आणि मग...

कुत्र्याला फिरवायला निघाला होता, रस्त्यात सापडली कोट्यावधी वर्ष जुनी वस्तू आणि मग...

एक व्यक्ती त्याच्या कुत्र्याला फिरण्यासाठी घेऊन गेला होता. तेव्हाच त्याच्या हाती अशी गोष्ट लागली ज्याबाबत त्याने विचारही केला नसेल. पण आता त्याने जगाला याची माहिती दिली. ही घटना फ्रान्समधील आहे. डेमियन बोशेटो नावाच्या व्यक्तीला 2022 सालात 7 कोटी वर्ष जुनी एक वस्तू सापडली. जी दिसायला फार विशाल होती. जेव्हा त्याने जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला समजलं की, हा डायनासॉरचा सांगाडा आहे.

25 वर्षीय बोशेटो म्हणाला की, त्याला हा शोध त्याच्या घराजवळील जंगलात लागला. तो फ्रान्सच्या एका गावात राहतो. तो म्हणाला की, ज्या भागात हे मला सापडलं तो भाग डायनासॉर आणि त्या काळातील जीवांचे अवशेष मिळण्यासाठी फेमस आहे. 28 वर्षापासून क्रूजी फ्रान्समधील डायनासॉरच्या अवशेषांसाठी एक सगळ्यात मोठं संग्रह म्हणून फेमस आहे. 

बोशेटोला आधी केवळ हाडे सापडली होती. पण नंतर पूर्ण सांगाडा सापडला. तो म्हणाला की, हे सकाळी फिरत असताना झालं. मी माझ्या कुत्र्याला फिरवायला घेऊन जात होतो. तेव्हा डोंगरात एक भूस्खलन झालं आणि मला हाडे दिसली. मला काही दिवसांनी समजलं की, ही हाडे एका जीवाची आहेत.

क्रूजी संग्रहालयाचे आर्कियोलॉजिकल अॅन्ड पॅलियोनटोलॉजिस्ट कल्चरल असोसिएशनचे सदस्यासोबत बोशेटोने खोदकाम केलं. ज्यात एक मोठा सांगाडा सापडला. पण हे आजपर्यंत गुप्त ठेवण्यात आलं होतं कारण हे ठिकाण सुरक्षित ठेवण्यात यावं. आता हा सांगाडा म्युझिअममध्ये ठेवण्यात आला आहे. जो सामान्य लोक बघू शकतात. 

Web Title: Man walking his dog discovered 7 crore years old dinosaur skeleton fossil fuels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.