'अंत्यसंस्काराला कुटुंबियांनी माझं मांस खावं', शेवटची ईच्छा ऐकून परिवारातील लोक 'कोमात'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2023 10:51 AM2023-02-25T10:51:00+5:302023-02-25T10:51:20+5:30
Interesting Facts : आपल्या देशात सामान्यपणे लोक मृत्यूबाबत बोलण्यावर टाळतात. पण काही लोक इतके बिनधास्त असतात की, ते त्यांची शेवटची ईच्छा आधीच सांगून ठेवतात.
Interesting Facts : व्यक्तीच्या आपापल्या काही ईच्छा असतात, ज्या त्यांना पूर्ण करायच्या असतात. काही ईच्छा त्यांना जीवन जगत असताना पूर्ण झालेल्या बघायच्या असतात तर काही मृत्यूनंतर पूर्ण करायच्या असतात. सामान्यपणे लोक आपल्या अंत्यसंस्कारासंबंधी ईच्छा कुटुंबियांना सांगतात. एका व्यक्तीने अशीच त्याची शेवटची ईच्छा सांगितली होती. पण ती इतकी अजब होती की, वाचूनच हैराण व्हायला होतं.
आपल्या देशात सामान्यपणे लोक मृत्यूबाबत बोलण्यावर टाळतात. पण काही लोक इतके बिनधास्त असतात की, ते त्यांची शेवटची ईच्छा आधीच सांगून ठेवतात. ते बिनधास्त सांगतात की, त्यांचा अंत्यसंस्कार कसा केला जावा. पण आम्ही ज्या घटनेबाबत सांगत आहोत ती फारच वेगळी आहे. कारण एका व्यक्तीची ईच्छा होती की, त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या परिवारातील लोकांनी त्याचं मांस खावं.
डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, इयान एटकिंस्टन नावाच्या एका व्यक्तीने लोकांच्या शेवटच्या ईच्छांबाबत रिसर्च केला. त्यात त्याला एका अशा ब्रिटिश व्यक्तीच्या ईच्छेबाबत समजलं, ज्याची ईच्छा होती की, मृत्यूनंतर त्याच्या परिवारातील लोकांनी त्याचं मांस खावं. त्याची ईच्छा होती की, त्याचे छोटे छोटे तुकडे करून परिवारातील लोकांना खायला द्यावे. पण ब्रिटेनमध्ये नरभक्षण वैध नाही. अशात त्याची शेवटची ईच्छा पूर्ण होऊ शकली नाही. पण हे समोर आल्यावर लोक घाबरले नक्कीच होते.
दरम्यान ब्रिटेनमधील या व्यक्तीची ईच्छा भलेही पूर्ण झाली नसेल, पण सेनेमा नावाच्या जमातीमध्ये त्याचा जन्म झाला असता तर त्याची ही ईच्छा पूर्ण झाली असती. या जमातीमध्ये लोक अंत्यसंस्कारासाठी मृत शरीर पाने आणि इतर काही वस्तूंनी झाकतात. 30 ते 40 दिवसांनी मृत शरीर परत आणतात आणि शिल्लक राहिलेलं शरीर जाळतात. त्यातून जी राख तयार होते, लोक त्याचं सूप बनवून पितात. या रिवाजाचं पालन पारंपारिक पद्धतीने केलं जातं.