अर्ध्या रात्री झुरळ मारत होती व्यक्ती, चुकून घरातच केला मोठा स्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2023 10:25 AM2023-12-16T10:25:51+5:302023-12-16T10:26:44+5:30
आपल्या अपार्टमेंटमध्ये एक झुरळ बघून व्यक्ती वैतागली होती आणि त्याला मारण्यासाठी त्याने पॉयझन असलेला स्प्रे घेतला.
Weird Incident: जपानच्या कुमामोटोच्या चुओ वार्डमध्ये एक अजब घटना घडली. इथे एक 54 वर्षीय जपानी व्यक्तीने एका झुरळ मारण्याचा प्रयत्न केला आणि चुकून आपल्याच अपार्टमेंटमध्ये स्फोट केला. ही घटना 10 डिसेंबरची अर्ध्या रात्रीची आहे. मेनची शिंबुनच्या रिपोर्ट्सनुसार, या हैराण करणाऱ्या घटनेबाबत समजल्यावर लोक हैराण झाले. तेव्हापासून या घटनेची चर्चा सुरू आहे.
आपल्या अपार्टमेंटमध्ये एक झुरळ बघून व्यक्ती वैतागली होती आणि त्याला मारण्यासाठी त्याने पॉयझन असलेला स्प्रे घेतला. झुरळ पळून जावं म्हणून त्याने स्प्रे खूप जास्त मारला. हैराण करणारी बाब म्हणजे केवळ एक मिनिटानंतर अपार्टमेंमध्ये जोरदार धमाका झाला. ज्यामुळे बाल्कनीची खिडकी तुटली. तर व्यक्तीला सामान्य जखमा झाल्या.
कीटनाशक स्प्रे करण्याआधी विचार करा
अधिकाऱ्यांनी सांगितलं की, जपानमध्ये नॅशनल कन्ज्यूमर अफेअर्स सेंटर ऑफ जपानला वेगवेगळ्या घटनांची सूचना मिळाली. जिथे कीटकनाशकांचा वापर विजेच्या तारांजवळ झाला आणि धमाका झाला. कीटकनाशक कंपन्यांनी सुद्धा सूचना दिली आहे की, कीटकनाशक स्प्रे करणं घातक आहे, ज्यामुळे अनेक घटना घडू शकतात आणि इजाही होऊ शकते.
फ्लोरिडा यूनिव्हर्सिटीचे कीटक वैज्ञानिक प्रोफेसर फिलिप कोएहलर यांनी या खतरनाक पद्धतीबाबत इशारा दिला. त्यांनी हीटर आणि उपकरणांमधून निघणाऱ्या गॅसजवळ ज्वलनशील पदार्थ स्प्रे करू नका. काही ठिकाणांवर लिक्विड स्प्रे करणं घातक ठरू शकतं.