भेटा Real Life 'गजनी'ला, दर सहा तासांनी विसरतो सगळं काही, मुलाचा जन्मही आठवत नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2021 04:55 PM2021-11-16T16:55:46+5:302021-11-16T16:55:55+5:30

एका व्यक्तीने ६ वर्षाआधी झालेल्या एका अपघातात आपली स्मरणशक्ती गमावली. आता ही व्यक्ती दर सहा तासांनंतर सगळं काही विसरतो

Man who lost his memory now remembers things only for 6 hours | भेटा Real Life 'गजनी'ला, दर सहा तासांनी विसरतो सगळं काही, मुलाचा जन्मही आठवत नाही!

भेटा Real Life 'गजनी'ला, दर सहा तासांनी विसरतो सगळं काही, मुलाचा जन्मही आठवत नाही!

Next

आमीर खानचा सुपरहिट सिनेमा 'गजनी' तुम्ही नक्कीच पाहिला असेल. या सिनेमातील आमीरच्या भूमिकेला एक वेगळ्या प्रकारचा मेमरी डिसऑर्डर असतो. तो काही वेळाने त्याच्यासोबत घडलेली घटना किंवा कोणतीही बाब लक्षात राहत नाही. या मानसिक आजाराला शॉर्ट-टर्म मेमरी लॉस असं म्हटलं जातं. 

या आजाराने ग्रस्त व्यक्तीला काही मिनिटांपूर्वी किंवा काही तासांपूर्वीच्या घटना लक्षात राहत नाहीत. पीडितांना माहिती किंवा घटना आठवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. या आजारात पीडिताची काही मिनिटांपासून ते काही दिवसांपर्यंतही मेमरी जाते. असं फक्त सिनेमातच होतं असं नाही तर रिअल लाइफमध्येही होतं. याचं एक उदाहरण जर्मनीत बघायला मिळालंय. येथील एक व्यक्ती त्याच्या मेमरी लॉसमुळे चर्चेत आहे.

सहा तासांपूर्वीच्या गोष्टी विसरतो

एका व्यक्तीने ६ वर्षाआधी झालेल्या एका अपघातात आपली स्मरणशक्ती गमावली. आता ही व्यक्ती दर सहा तासांनंतर सगळं काही विसरतो. या व्यक्तीने जर त्याच्यासोबत झालेल्या घटनांच्या नोट किंवा माहिती लिहून ठेवल्या नाही तर त्याला सहा तासांनंतर काहीच आठवण राहत नाही.

Six hours memory असलेल्या या व्यक्तीचं नाव आहे डेनिअल श्मिट. त्याचा काही वर्षापूर्वी अपघात झाला होता. त्यावेळी डेनिअल आपल्या बहिणीला भेटायला जात होता. डेनिअलचा हा अपघात फार भयंकर होता. या डेनिअलचा जीव तर वाचला, पण त्याची स्मरणशक्ती गेली. तो मेमरी लॉसने पीडित झाला.

डेनिअल आता सहा तासांपूर्वीच्या गोष्टी लक्षात ठेवू शकत नाही. जर तो एखाद्या ठिकाणाची किंवा कामाची नोट ठेवत नाही तर त्याच्या डोक्यातून सहा तासांनंतर सगळं काही पुसलं जातं. त्याला अपघातात डोक्याला गंभीर मार लागला होता. स्थिती अशी होती की, त्याला उपचारासाठी एअरलिफ्ट करावं लागलं होतं.

या अपघाताने त्याची स्मरणशक्ती गेली. फिजिओथेरपी आणि स्पीच थेरपीच्या मदतीने डेनिअल आता हळूहळू ठीक होत आहे. आता त्याला गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी आपल्या जवळ एक डायरी ठेवावी लागते.

मुलाचा जन्मही आठवत नाही

काही वर्षाआधी डेनिअल आणि त्याची पत्नी कॅथरीना एका मुलाचे पालक झाले. डेनिअलला याची आठवण नाही की त्याचा मुलगा कसा वाढतो आहे. तो सांगतो की, त्याला त्याच्या मुलाने जन्म घेतला हेही आठवत नाही आणि याचं त्याला फार दु:खं वाटतं.
 

Web Title: Man who lost his memory now remembers things only for 6 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.