याला म्हणतात नशीब! 80 कोटींचा मालक, रातोरात कोट्यधीश झालेला 'तो' आता शोधतोय नवरी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2022 12:20 PM2022-11-10T12:20:37+5:302022-11-10T12:23:56+5:30

41 वर्षांची ही व्यक्ती आता जोडीदाराच्या शोधात आहे. जेणेकरून पुढचं आयुष्य तो एकदम आलिशान पद्धतीने जगेल. तिच्यासोबत पैसे खर्च करेल.

man who won 80 crore rupees on lottery looking for wife to share riches | याला म्हणतात नशीब! 80 कोटींचा मालक, रातोरात कोट्यधीश झालेला 'तो' आता शोधतोय नवरी

फोटो - Kürsat Yildirim/ Facebook

googlenewsNext

कोणाचं नशीब कधी, कसं फळफळेल हे सांगता येत नाही. अनेक जण रातोरात कोट्यधीश झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अशीच एक घटना आता पुन्हा एकदा समोर आली असून एक व्यक्ती एका रात्रीत जवळपास 80 कोटीचा मालक झाला आहे. पैसे मिळताच त्याने नोकरी सोडली, पैसे खर्च करण्यास सुरुवात केली पण आता त्याला पैसे खर्च करण्यासाठी एक पार्टनर हवी आहे. सध्या तो पत्नीच्या शोधात आहे. 

जर्मनीमध्ये ही घटना घडली आहे. 24 सप्टेंबरला जर्मनीतल्या डॉर्टमुंड येथील रहिवासी कुर्सेट यिल्दिरिम याने मोठी लॉटरी जिंकली. त्याला 81 कोटी रुपये मिळाले. यानंतर त्याने लगेचच पैसे खर्च करण्यास सुरुवात केली. तो एका स्टील कंपनीत काम करायचा पण लॉटरी मिळताच त्याने ज़ॉब सोडला. त्याने सर्वात आधील जवळपास 3.6 कोटींचा Ferrari 448 Pista घेतली. त्यानंतर जवळपास दोन कोटींची Porsche Turbo S Cabriolet कार घेतली आहे. तसेच महागडी घड्याळं देखील घेतली आहेत. 

41 वर्षांची ही व्यक्ती आता जोडीदाराच्या शोधात आहे. जेणेकरून पुढचं आयुष्य तो एकदम आलिशान पद्धतीने जगेल. तिच्यासोबत पैसे खर्च करेल. बिल्ड या जर्मन वृत्तपत्राला त्याने मुलाखत दिली. यामध्ये त्याने "मी अजून लग्न केलेलं नाही. मला बायको हवी आहे. ती गोरी किंवा काळी कशीही चालेल. मला पर्वा नाही. मला प्रेमात पडायचंय…मला एका अशआ मुलीचा शोध आहे. जिला फिरण्याची प्रचंड आवड असेल."

"माझ्यासोबत एक नवीन प्रवास आणि संसार सुरू करण्यासाठी तिची तयारी असावी. कोणत्याही स्थितीत मी तिच्यावर विश्वास ठेवू शकेल, अशी ती असावी" असं म्हटलं आगे. या व्यक्तीने लॉटरी जिंकल्यानंतरचा अनुभव शेअर केला. तो म्हणाला, "मी माझी स्वतःची खूप काळजी घेऊ शकतो. मी सावध आहे. माझा पैसा सुरक्षित हातात आहे. मला आफ्रिकेला जायचंय. विहिरी खोदणाऱ्यांना तसेच तेथील मुलांना गिफ्ट द्यायचेत. माझ्या हातून काही चांगली कामं होती, अशी देवाकडे प्रार्थना करतो" असंही म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: man who won 80 crore rupees on lottery looking for wife to share riches

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.