बाबो! 'या' व्यक्तीच्या गॅस सोडण्याने होतो डासांचा नायनाट, एका कंपनीने जॉब दिला ना भौ!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2019 11:36 AM2019-12-13T11:36:59+5:302019-12-13T11:53:53+5:30

डासांना मारण्यासाठी लोक काय काय करतात. पण ही व्यक्ती केवळ त्याच्या गॅसने डास मारू शकतो.

Man whose farts can kill mosquitoes six metres away hired to by a company in Uganda | बाबो! 'या' व्यक्तीच्या गॅस सोडण्याने होतो डासांचा नायनाट, एका कंपनीने जॉब दिला ना भौ!

बाबो! 'या' व्यक्तीच्या गॅस सोडण्याने होतो डासांचा नायनाट, एका कंपनीने जॉब दिला ना भौ!

Next

सध्या घराघरात डासांनी लोकांचं जगणं हैराण केलं आहे. हेच डास वेगवेगळ्या गंभीर आजारांचं कारण ठरताहेत. अशात लोक डास पळवून लावण्यासाठी जमेल ते प्रयत्न करतात. यासाठी बराच खर्चही काही लोक करतात. अशात एका व्यक्तीने तो गॅस सोडून डास मारू शकतो असा दावा केलाय. त्यामुळे याला सुपरमॅन म्हणावं की काय असं झालंय.

Joe Rwamirama हा युगांडाचा राहणारा आहे. त्याचा दावा आहे की, तो गॅस सोडून डास मारू शकतो. इतकेच नाही तर तो ६ मीटर दूरपर्यंत असलेले डास त्याच्या गॅसने मारू शकतो. म्हणजे एवढ्या अंतरात जे डास असतील ते वाचणार नाहीत. असा त्याने दावा केलाय.

बरं हे इतक्यावरच थांबलं नाही तर एका डास मारण्याचं औषध तयार करणाऱ्या कंपनीने या माणसाला नोकरीवर ठेवून घेतलंय. कंपनीने सांगितले की, ते या व्यक्तीच्या गॅसपासून डास मारण्याचं औषध तयार करतील.

Joe ने सांगितले की, 'मी सामान्य माणसांप्रमाणेच जेवण करतो. रोज आंघोळ करतो. बस माझा गॅस वेगळा आहे. तो डास त्याच्या आजूबाजूला येऊही देत नाही'. आजूबाजूच्या लोकांनी सांगितले की, Joe फारच प्रसिद्ध आहे. त्याच्या पादण्याचे किस्से दूरदूरपर्यंत पोहोचतात.


Web Title: Man whose farts can kill mosquitoes six metres away hired to by a company in Uganda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.