एक डोळाच नसल्याने याला घाबरत होते लोक, मात्र त्याने एका दुर्मिळ कॅन्सरला दिली मात!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 12:58 PM2020-01-27T12:58:18+5:302020-01-27T13:11:09+5:30
झोंबींबाबत तुम्ही बरंच काही ऐकलं असेलच किंवा झोंबींवर आधारित हॉलिवूड सिनेमे तर नक्कीच बघितले असतील. पण ते सगळे काल्पनिक असतात.
(Image Credit : allthatsinteresting.com)
झोंबींबाबत तुम्ही बरंच काही ऐकलं असेलच किंवा झोंबींवर आधारित हॉलिवूड सिनेमे तर नक्कीच बघितले असतील. पण ते सगळे काल्पनिक असतात. मात्र, आज आम्ही तुम्हाला आज अशा एका व्यक्तीबाबत सांगणार आहोत, जो खरंच झोंबीसारखा दिसत होता आणि लोक त्याच्यापासून दूर पळत होते.
बील्ली ओवेन असं या व्यक्तीचं नाव असून तो तोंडात बोट टाकून डोळ्याच्या सॉकेटमधून बाहेर काढतो. ही गंमत किंवा खोटं नाही. हे खरं आहे. बीली एक मोटार मेकॅनिक होता. त्याला २००९ मध्ये फारच दुर्मिळ आणि घातक असा Nasal कॅन्सर झाला होता.
बीलीला त्याला झालेल्या या कॅन्सरबाबत फार नंतर कळाले. तोपर्यंत त्याच्या ट्यूमरने भयानक रूप घेतलं होतं. ट्यूमर संपूर्ण चेहऱ्यावर पसरला होता. आता अशा स्थितीत त्याची वाचण्याची केवळ १० टक्केच शक्यता होती. त्यामुळे डॉक्टरांना बीलीचा अर्धा चेहरा काढावा लागला.
(Image Credit : allthatsinteresting.com)
ऑपरेशननंतर बीलीकडे हुंगण्याची शक्ती फारच कमी राहिली होती आणि त्याचा डावा डोळा पूर्णपणे काढून टाकण्यात आला. त्यानंतर त्याच्या डोळ्याची जागा एका रिकाम्या सॉकेटसारखी दिसते.
ओवेनने सांगितले की, कसा तो काळ त्याच्यासाठी आणि त्याच्या परिवारासाठी कठिण होता. त्याला आजारामुळे नोकरी सोडावी लागली होती आणि नव्या चेहऱ्यासोबत सहज होण्यासाठीही त्याला बराच वेळ लागला. पण त्याला स्वत:वर हा विश्वास होता की, सगळं काही ठीक होईल. आता बीली सिनेमांमध्ये झोंबीच्या भूमिका करतो.