दुकानदाराच्या चुकीमुळे उघडले ग्राहकाचे नशीब, मिळाले सहा कोटी रुपये!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 02:49 PM2022-04-21T14:49:58+5:302022-04-21T14:51:19+5:30
या पैशाने माझ्या आयुष्यातील अनेक समस्या दूर होतील. आता सर्व आर्थिक चिंता संपल्या आहेत, असे जोश यांनी म्हटले आहे.
एका व्यक्तीने लॉटरीमध्ये 6 कोटींहून अधिक रुपये जिंकले आहेत. यासाठी तो लॉटरी टर्मिनलच्या क्लर्कचे आभार मानत आहे. क्लर्कच्या चुकीमुळेच एवढी मोठी लॉटरी लागल्याचे या व्यक्तीचे मत आहे. जोश बस्टर असे या व्यक्तीचे नाव असून हे प्रकरण अमेरिकेतील लोवा प्रांतातील आहे.
जोश हे शुक्रवारी रात्रीच्या मेगा मिलियन्स ड्रॉची तिकिटे घेण्यासाठी लॉटरी टर्मिनलवर पोहोचले. तेथे त्यांनी 5 नंबर्सची मागणी केली. मात्र चुकून दुकानातील क्लर्कने तिकिटावर एकच नंबर प्रिंट केला. नंतर उरलेले चार नंबर्स दुसऱ्या तिकिटावर प्रिंट करून दिले. दुकानातील क्लर्कच्या या चुकीमुळेच त्यांना लॉटरी लागल्याचे जोश यांचे मत आहे. क्लर्कने चूक केली नसती आणि एका तिकिटावर सर्व नंबर्स प्रिंट केले असते. तर त्या नंबर्समध्ये अंतर राहिले नसते, असे जोश यांनी म्हटले आहे.
"मी कामावर जाण्यासाठी सकाळी लवकर उठलो. यानंतर मी लॉटरी अॅप उघडले आणि माझा विनर नंबर सर्च केला. मी माझी तिकिटे नेहमी कारच्या कन्सोलमध्ये ठेवतो. आणि मी कारमध्येच लॉटरी विजेत्यांची नावे तपासली. त्यानंतर मी धावतच घरात गेलो. सुरवातीला माझा विश्वासच बसेना. सहसा माझे नशीब चांगले नसते", असे जोश यांनी सांगितले.
जोश यांनी आपली बक्षीस रक्कम क्लाइव्ह येथील लोवा लॉटरी मुख्यालयातून गोळा केली आहे. लोवा लॉटरीने सांगितले की, जोश यांनी त्यांचे तिकीट वेस्ट बर्लिंग्टन येथील एमके मिनी मार्टमधून खरेदी केले होते. जोश यांना फक्त 124 कोटी रुपयांच्या जॅकपॉट नंबरमधून पहिले 5 नंबर मिळत होते. त्यामुळेच त्यांना मेगा बक्षीस मिळाले नाही आणि त्यांना फक्त 6 कोटी रुपये मिळाले. दरम्यान, या पैशाने माझ्या आयुष्यातील अनेक समस्या दूर होतील. आता सर्व आर्थिक चिंता संपल्या आहेत, असे जोश यांनी म्हटले आहे.