नशीबवान! एकेकाळी जेलमध्ये होता, नंतर 92 कोटींची लॉटरी; आता पोलीस इन्स्पेक्टरला करतोय डेट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2023 12:51 PM2023-08-19T12:51:17+5:302023-08-19T12:51:46+5:30
कुर्सतकडे आता एवढी संपत्ती आहे की तो कोणतंही काम न करता आता त्याचा आनंद घेत आहे. त्याच्यासोबत डेट करण्यासाठी महिलांची मोठी रांग लागली आहे.
चोर नेहमीच पोलिसांपासून अंतर राखतात. मात्र आता एक अजब घटना समोर आली आहे. जेलमध्ये शिक्षा भोगलेल्या एका व्यक्तीला चक्क पोलीस इन्स्पेक्टर आवडली आणि आता तो तिला डेट करत आहे. मिररच्या वृत्तानुसार, जर्मनीमध्ये राहणार्या कुर्सत यिल्दिरिम या व्यक्तीचं नशीब असं बदललं की तुरुंगातून बाहेर आल्यानंतर तो थेट करोडपती झाला.
कुर्सतकडे आता एवढी संपत्ती आहे की तो कोणतंही काम न करता आता त्याचा आनंद घेत आहे. त्याच्यासोबत डेट करण्यासाठी महिलांची मोठी रांग लागली आहे. पण तो मात्र एका पोलीस इन्स्पेक्टरला डेट करत आहे.
कधी जेलमध्ये होता, आता पोलीस इन्स्पेक्टरचा बॉयफ्रेंड झाला. कुर्सतला चिको या टोपणनावाने ओळखलं जातं. तो एकेकाळी जेलमध्ये होता. पण बाहेर आल्यावर त्याला £8.7 मिलियन म्हणजेच 92 कोटींची लॉटरी लागली. गेल्या वर्षी मिळालेल्या या लॉटरीच्या पैशामुळे तो फक्त श्रीमंतच झाला नाही तर प्रसिद्धही झाला.
कुर्सतने स्वत:साठी अशी गर्लफ्रेंड निवडली की ऐकून तुम्हाला धक्काच बसेल. एक दिवस एक लेडी इन्स्पेक्टरने या व्यक्तीला म्हणजेच जेलमध्ये शिक्षा भोगलेल्या कुर्सतला वेगामुळे रस्त्या अडवलं आणि गाडीतून बाहेर काढलं. दंड भरायला लावला. कुर्सत इन्स्पेक्टरच्या प्रेमात पडला आणि तिला कॉफी पिण्यासाठी घेऊन गेला. आता ती त्याची गर्लफ्रेंड आहे.
42 वर्षीय कुर्सतची ही गोष्ट लोकांना खूपच अजब वाटत आहे. पोलीस इन्स्पेक्टरच्या तो कसा प्रेमाच पडला हे गुपित त्याने सोशल मीडियावर लोकांना सांगितलं आहे. त्याने सांगितले की, त्याच्याकडे डेटिंगच्या अनेक ऑफर आहेत, पण त्याला इन्स्पेक्टरचा आत्मविश्वास आणि लूक आवडला. तसेच ती स्वत: कमावत असल्याने, कुर्सतच्या पैशाच्या प्रेमात नाही. एका हिंदी वेबसाईटने य़ाबाबतचे वृत्त दिले आहे.