12 महिलांसोबत लग्न, 102 मुलांचा वडील; आता सरकारकडे मागतोय मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2022 03:52 PM2022-12-27T15:52:31+5:302022-12-27T15:53:31+5:30

Jarahatke : युगांडाच्या बुगिससामध्ये राहणारे 67 वर्षीय मूसा हसहया यांनी 12 पत्नींना गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर करण्यास सांगितलं आहे. ते म्हणाले की, मी आणखी मुलांचा पालन-पोषण करू शकत नाही.

Man with 102 children orders his 12 wives on the pill as he cant tolerate any more | 12 महिलांसोबत लग्न, 102 मुलांचा वडील; आता सरकारकडे मागतोय मदत

12 महिलांसोबत लग्न, 102 मुलांचा वडील; आता सरकारकडे मागतोय मदत

googlenewsNext

Jarahatke :  जगभरातून वेगवेगळ्या अजब घटना समोर येत असतात. अशीच एक घटना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. एका व्यक्तीला 12 पत्नी आणि 102 मुले आहेत. त्याचं वय 67 आहे आणि त्यांनी आता निर्णय घेतला आहे की, ते त्यांचा परिवार पुढे वाढवणार नाहीत. त्यांच्या इतक्या मोठ्या परिवाराच्या पालन-पोषणाच्या कारणाने त्यांनी असा निर्णय घेतला.

युगांडाच्या बुगिससामध्ये राहणारे 67 वर्षीय मूसा हसहया यांनी 12 पत्नींना गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर करण्यास सांगितलं आहे. ते म्हणाले की, मी आणखी मुलांचा पालन-पोषण करू शकत नाही. कारण साधनं कमी आहेत.  त्यामुळे प्रेन्गन्सीच्या वयात असलेल्या पत्नींना त्या सगळींना त्यांनी गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर करण्यास सांगितलं आहे. 

मूसा यांनी पुढे सांगितलं की, ज्या लोकांना 4 पेक्षा जास्त लग्न करायचे आहेत. मी त्यांनाही असं करण्याचा सल्ला देतो. कारण गोष्टी बिघडू लागतात. मूसाला 568 नातू-नातवंड आहेत. हे सगळे लोक 12 बेडरूमच्या एकाच घरात राहतात.

मूसा म्हणाले की, ते त्यांच्या सगळ्या नातू-नातवंडांना नावाने ओळखत नाहीत. त्यांनी 1971 मध्ये हनीफासोबत पहिलं लग्न केलं होतं. त्यावेळी ते 16 वर्षांचे होते. त्यांनी शाळा सोडली होती. दोन वर्षानी ते वडील झाले. तेव्हा हनीफाने मुलीला जन्म दिला होता.

गावाचे मुख्य आणि बिझनेसमॅन असण्याच्या नात्याने मूसा यांनी सांगितलं की, त्यावेळी त्यांना त्यांची फॅमिली वाढवायची होती. कारण त्यांच्याकडे तेव्हा पैसे आणि जमीन होती. ते म्हणाले की, त्यामुळे मी निर्णय घेतला की, मी आणखी लग्नं करावे आणि परिवार वाढवावा.

पण आता मूसा सरकारला मदत मागत आहे. ते म्हणाले की, सगळ्या मुलांच्या शिक्षणासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत. पण इतका मोठा परिवार असूनही ते सगळे सोबत आहेत.
 

Web Title: Man with 102 children orders his 12 wives on the pill as he cant tolerate any more

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.