बाबो! घरबसल्या 'तो' झाला करोडपती; 7 वर्षे बायकोपासून लपवलं अन्...; 'हे' आहे कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2023 16:00 IST2023-10-07T16:00:17+5:302023-10-07T16:00:54+5:30
एका व्यक्तीला 1 कोटी रुपयांची लॉटरी लागली. सहसा, लॉटरी जिंकल्यानंतर, लोक स्वतःसाठी महागड्या वस्तू खरेदी करतात किंवा मालमत्ता खरेदी करतात, परंतु या माणसाने असं काहीही केलं नाही.

बाबो! घरबसल्या 'तो' झाला करोडपती; 7 वर्षे बायकोपासून लपवलं अन्...; 'हे' आहे कारण
कोणाचं नशीब कधी आणि कसं फळफळेल हे सांगता येत नाही. अशीच एक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीचं अचानक नशीब पालटलं आणि तो थेट करोडपती झाला. पण त्याने आपण करोडपती झाल्याचं कुटुंबाला विशेषत: त्याच्या बायकोला देखील सांगितलं नाही. एक दोन वर्षे नव्हे तर त्याने तब्बल सात वर्षे बायकोपासून त्याला लॉटरी लागल्याचं लपवून ठेवलं,
डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, एका व्यक्तीला 1 कोटी रुपयांची लॉटरी लागली. सहसा, लॉटरी जिंकल्यानंतर, लोक स्वतःसाठी महागड्या वस्तू खरेदी करतात किंवा मालमत्ता खरेदी करतात, परंतु या माणसाने असं काहीही केलं नाही. त्याच्याकडे इतके पैसे आहेत हे त्याने घरच्यांनाही कळू दिलं नाही. त्याने पत्नीलाही अंधारात ठेवलं.
या व्यक्तीने सोशल मीडिया मायक्रोब्लॉगिंग साइटवर @Fesshole नावाच्या अकाऊंटद्वारे त्याच्यासोबत घडलेली ही घटना सांगितली. या व्यक्तीने सांगितले की त्याने 7 वर्षांपूर्वी स्क्रॅच कार्डद्वारे 1 कोटी रुपये जिंकले होते. हे त्याने आपल्या पत्नीलाही सांगितले नाही आणि पेन्शनसाठी संपूर्ण रक्कम ठेवली. त्याने आपल्या पत्नीला सांगितले नाही कारण तिने त्याला ते इतरांसोबत शेअर करण्यास सांगितले असते, म्हणून त्याऐवजी त्याने हळूहळू ते पैसे त्याच्या पेन्शन खात्यात जमा केले.
ही पोस्ट सुमारे 40 लाख लोकांनी पाहिली आहे आणि त्यांनी या व्यक्तीला बोरिंग म्हटलं आहे कारण त्याने सर्व पैसे त्याच्या पेन्शन खात्यात जमा केले आहेत. ते मिळाले असते तर त्यांनी स्वत:साठी चैनीच्या वस्तू विकत घेतल्या असत्या आणि आपली संपत्ती जगाला दाखवली असती, असे काही लोक म्हणाले. त्याच वेळी, काही लोकांनी या गुंतवणुकीचे समर्थन केले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.