आधी लागली 6 कोटी रूपयांची लॉटरी, त्यातून खरेदी केलं शेत; शेतातही सापडलं मोठं धन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 11:21 AM2024-02-22T11:21:46+5:302024-02-22T11:23:54+5:30

आज आम्ही तुम्हाला एका अशा व्यक्तीबाबत सांगणार आहोत ज्याबाबत वाचून तुम्ही अवाक् व्हाल. कारण त्याचं नशीब फारच जोरावर होतं.

Man won lottery worth 6 crore bought land again Found buried treasure | आधी लागली 6 कोटी रूपयांची लॉटरी, त्यातून खरेदी केलं शेत; शेतातही सापडलं मोठं धन

आधी लागली 6 कोटी रूपयांची लॉटरी, त्यातून खरेदी केलं शेत; शेतातही सापडलं मोठं धन

तुम्ही अशा अनेक घटनांबाबत ऐकलं असेल ज्यात काही लोकांचं नशीब काही सेकंदात बदललं. त्यांच्या हाती एकतर मोठा खजिना लागला नाही तर एखादी मोठी लॉटरी लागली. पण आज आम्ही तुम्हाला एका अशा व्यक्तीबाबत सांगणार आहोत ज्याबाबत वाचून तुम्ही अवाक् व्हाल. कारण त्याचं नशीब फारच जोरावर होतं.

केरळमध्ये राहणाऱ्या 66 वर्षीय व्यक्तीची ही कहाणी आहे. ख्रिसमस दरम्यान बी रत्नाकर पिल्लई नावाच्या या व्यक्तीचं नशीब फारच जोरावर होतं. त्याला लॉटरी लागली आणि 5, 10 लाख नाही तर 6 कोटी रूपये मिळाले.

शेत खरेदी केलं अन् मिळालं धन

बी रत्नाकर पिल्लईला लॉटरीची रक्कम मिळाली तेव्हा त्याने इन्व्हेस्टमेंट करण्याचा विचार केला. अशात त्याने तिरुअनंतपुरमपासून काही किलोमीटर अंतरावर किलिमनूरमध्ये एक शेत खरेदी केलं. या शेतात त्यांनी रताळ्यांची लागवड करण्याचा विचार केला. अशात त्यांनी शेतात खोदकाम सुरू केलं. त्यांचं नशीब पुन्हा एकदा चमकलं. त्यांच्या हाती धनाचा एक हांडा लागला. त्यांना विश्वासच बसला नाही की, त्यांच्यासमोर एक मडकं होतं. ज्यात नाणी होती. हे एखाद्या काल्पनिक कथेसारखंच होतं.

100 वर्ष जुना खजिना

शेताची वाई करत असताना साडलेल्या मडक्यांमध्ये नाणी भरलेली होती. जी 100 वर्ष जुनी होती. यात एकूण 2595 प्राचीन नाणी होती. ज्यांचं वजन 20 किलो होतं. नाणी तांब्याची होती आणि त्रावणकोर साम्राज्यातील होती. प्राचीन असल्याकारणाने यांचं ऐतिहासिक महत्वही होतं. अशात त्यांना याचा फायदाही मिळाला. तशी ही घटना 2019 सालातील आहे. पण जेव्हाही नशीबवान लोकांचा विषय निघतो तेव्हा बी रत्नाकर पिल्लाई यांचीही सगळे आठवण काढतात.

Web Title: Man won lottery worth 6 crore bought land again Found buried treasure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.