या बाजारात येण्यास पुरुषांना बंदी, महिलाच चालवतात दुकाने
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2018 12:03 PM2018-04-28T12:03:53+5:302018-04-28T12:03:53+5:30
भारतात एक असंही मार्केट आहे जिथे केवळ महिला जातात आणि वस्तू विकणाऱ्याही महिलाच असतात. या बाजारात पुरुषांना येण्यास मनाई आहे.
तुम्ही तुमच्या शहरातील लोकल मार्केटमध्ये कधी ना कधी शॉपिंग केली असेल. यावेळी पुरुष आणि महिला एकत्र शॉपिंग करताना तुम्ही पाहिल्या असतील. बहुदा सगळ्याच मार्केटमध्ये महिला आणि पुरुष एकत्र शॉपिंग करतात. पण भारतात एक असंही मार्केट आहे जिथे केवळ महिला जातात आणि वस्तू विकणाऱ्याही महिलाच असतात. या बाजारात पुरुषांना येण्यास मनाई आहे. केवळ महिलांचा बोलबाला असलेलं हे मार्केट मणिपूरमध्ये आहे.
50 वर्ष जुना बाजार
मणिपूरची राजधानी इम्पालमध्ये मदर मार्केट नावाचं हे मार्केट लोकप्रिय आहे. गेल्या 500 वर्षांपासून हा बाजार भरतो आहे. या बाजारात पुरुषांना येण्यास मनाई आहे. 50 वर्षांपासून महिला इथे बाजार भरवतात. याचं कारण म्हणजे मणिपूरचे जास्तीत जास्त पुरुष हे सीमेच्या सुरक्षेसाठी आर्मीमध्ये भरती होतात. त्यामुळे सगळी जबाबदारी महिलांवर येऊन पडते. हळूहळू काळ लोटत गेला आणि इथे तसा रिवाज तयार झाला.
आशियातील सर्वात मोठ्या बाजारांपैकी एक
मदर मार्केट हे आशियातील सर्वात मोठ्या बाजारांपैकी एक आहे. इथे जवळपास 500 महिला एकत्र येऊन बाजार भरवतात. या बाजारात मासे, भाज्या आणि धातूंपासून तयार केलेले शिल्प आणि इतरही वस्तू मिळतात.
इतकी करतात कमाई
देशातील या सर्वात अनोख्या बाजारात महिलांची भरपूर गर्दी असते. महिला वस्तू खरेदी करताना व्यवस्थित संवाद साधतात. इथे दुकाने चालवणाऱ्या महिला कोणत्याही पुरुषांपेक्षा कमी नाहीयेत. इथे वस्तू विकणाऱ्या महिलांचं उत्पन्न जवळपास 50 हजार ते दोन लाख इतकं आहे.
ट्रेनिंग सेंटर
या बाजारात नवीन मुलींना उद्योगाचे धडे दिले जातात. म्हणजे एकप्रकारचं हे ट्रेनिंग सेंटरच आहे.