पाकिस्तानातील या प्राणी संग्रहालयातील वाघाच्या पिंजऱ्यात व्यक्तीने मारली उडी आणि मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2023 10:07 AM2023-12-09T10:07:35+5:302023-12-09T10:26:40+5:30
Pakistan : प्राणी संग्रहालयात येथील कर्मचाऱ्यांना वाघाच्या पिंजऱ्याच्या आत एका व्यक्तीचा अर्धा खाल्लेला मृतदेह आढळून आला.
Pakistan : प्राणी संग्रहालय किंवा एखाद्या नॅशनल पार्कमधील प्राणी बघण्यासाठी लोकांची मोठी गर्दी असते. या ठिकाणांवर अनेकदा लोक दगड मारतात किंवा ओरडतात. लोकांच्या या वागण्यामुळे प्राण्यांना नक्कीच त्रास होतो. अशात काही दुर्घटना घडली तर सगळ्यांना धक्का बसतो. अशीच एक घटना पाकिस्तानात घडली आहे.
पाकिस्तानच्या बहावलपूरच्या शेरबाग प्राणी संग्रहालयात येथील कर्मचाऱ्यांना वाघाच्या पिंजऱ्याच्या आत एका व्यक्तीचा अर्धा खाल्लेला मृतदेह आढळून आला. असं मानलं जात आहे की, या व्यक्तीने वाघाच्या पिंजऱ्याच्या आत उडी मारली होती.
वन्यजीव विभागाचे वरिष्ठ अधिकारी उस्मान बुखारीने एएफपीसोबत बोलताना सांगितलं की, अजून पोस्टमार्टम रिपोर्ट जारी केला नाहीये. तसेच पिंजऱ्यात मिळालेल्या पुराव्यांवरून हे दिसतं की, जेव्हा त्याच्यावर वाघांनी हल्ला केला तेव्हा तो जिवंत होता.
घटनेनंतर पंजाब पूर्व प्रांतातील हे प्राणी संग्रहालय बंद करण्यात आलं आहे. सोबतच हे जाणून घेण्यासाठी चौकशी केली जात आहे की, व्यक्ती वाघांच्या पिंजऱ्यात कशी गेली. बुखारीनुसार, वाघ त्या पिंजऱ्यातून व्यक्तीवर हल्ला करण्यासाठी बाहेर आले नाहीत, उलट ती व्यक्तीच त्यांच्या पिंजऱ्यात गेली.
त्यानी सांगितलं की, मृतदेहाची स्थिती इतकी वाईट होती की, त्या व्यक्तीची ओळखही पटू शकलेली नाही. तसेच कोणताही परिवार मृतदेहावर दावा करण्यासाठीही समोर आला नाही. आश्चर्याची बाब म्हणजे वाघाच्या पिंजऱ्यात उडी घेणाऱ्या या व्यक्तीला प्राणी संग्रहालयाच्या प्रशासनाने 'मूर्ख' ठरवून टाकलं आहे. येथील एक अधिकारी जहीर अनवर म्हणाला की, कोणतीही समजदार व्यक्ती वाघाच्या पिंजऱ्यात उडी घेणार नाही. स्थानिक मीडियासोबत बोलताना तो म्हणाला की, पिंजऱ्याच्या मागे पायऱ्या आहेत, तिथूनच ती व्यक्ती आत गेली असेल.