...अन् 'त्याच्या' डोळ्यात चक्क माशीने अंडी घातली; सत्य समजताच पायाखालची जमीन सरकली
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 10:50 AM2022-04-14T10:50:19+5:302022-04-14T10:57:23+5:30
डोळ्यात तीव्र जळजळ आणि लालसरपणामुळे जेव्हा ही व्यक्ती डॉक्टरकडे पोहोचली तेव्हा सत्य समजताच त्याला मोठा धक्का बसला.
काम करताना अनेक वेळा वेगवेगळ्या प्रकारचे अपघात होतात. काही नोकऱ्या खूप जोखमीच्या असतात. बर्याच वेळा कारखान्यात काम करणारा कामगार उकळत्या पदार्थात पडतो किंवा मग एखाद्या तीक्ष्ण वस्तूने इजा होते. मात्र अनेक वेळा अशा कामांमध्येही अपघात घडतात, जे धोकादायक वाटत नाहीत. अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे. फ्रान्समध्ये राहणारा एक व्यक्ती मेंढ्यांच्या फार्ममध्ये काम करायचा. अचानक एक माशी त्याच्या डोळ्यात शिरली आणि व्यक्तीच्या डोळ्यांची गंभीर अवस्था झाली आहे.
डोळ्यात तीव्र जळजळ आणि लालसरपणामुळे जेव्हा ही व्यक्ती डॉक्टरकडे पोहोचली तेव्हा सत्य समजताच त्याला मोठा धक्का बसला. व्यक्तीच्या डोळ्यांतून डझनभर माशांची अंडी काढून टाकण्यात आली. ही अंडी त्या व्यक्तीच्या डोळ्यांच्या खालच्या भागात जमा झाली होती. बराच वेळ व्यक्तीच्या उजव्या डोळ्यात खाज आणि लाल रंगाचा थर दिसत होता. आधी त्याला वाटले की त्याने डोळ्यात नख गेल्यामुळे असं झालं असेल. मात्र डॉक्टरांनी तपासणी केली असता माशीची अंडी काढण्यात आली.
डॉक्टरांनी त्या माणसाचे डोळे आता साफ केले आहेत पण त्यासोबत त्याला काही अँटीबायोटिक्सही दिले. जेणेकरुन आत दुसरे अंडं राहिलं असेल तर ते औषधातून बाहेर येईल. डॉक्टरांनी सांगितले की, या माशा सहसा मेंढ्या आणि शेळ्यांच्या नाकात आढळतात. यानंतर त्या मोठे झाल्यावर त्यांच्या शरीराला चिकटून राहतात आणि त्यांचे रक्त पिऊन जिवंत राहतात. परंतु कधीकधी ते मानवी डोळ्यात जातात, ज्यामुळे ऑप्थाल्मोमियासिस नावाचा आजार होतो.
अंड्यांमुळे डोळ्यांच्या बाहेरील पडद्याला खूप खाज येते. यामुळे डोळ्यांना लालसरपणा आणि खाज सुटते. यासोबतच डोळ्यातून पाणी यायला लागतं. काही प्रकरणांमध्ये, ही अंडी डोळ्यांना टोचतात, ज्यामुळे दृष्टीवर परिणाम होतो. हा 53 वर्षीय व्यक्ती बराच काळ फार्ममध्ये काम करत होता. पण काही दिवसांपूर्वी अचानक त्याच्या डोळ्यात काहीतरी गेल्याचे जाणवले. तेव्हापासून त्याचे डोळे लाल होऊ लागले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.