Marriage: लग्नाच्या मंडपात घुसला माकड, विधी सुरू असतानाच मध्ये घुसून केलं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2023 02:26 PM2023-03-23T14:26:32+5:302023-03-23T14:27:18+5:30

Marriage: सोशल मीडियावर सध्या लग्नाशी संबंधित अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ तर एवढे गमतीदार असतात की, त्यांना पाहिल्यावर आपल्याला हसू आवरता येत नाही.

Marriage: A monkey entered the wedding hall, did something like that while the ceremony was going on... | Marriage: लग्नाच्या मंडपात घुसला माकड, विधी सुरू असतानाच मध्ये घुसून केलं असं काही...

Marriage: लग्नाच्या मंडपात घुसला माकड, विधी सुरू असतानाच मध्ये घुसून केलं असं काही...

googlenewsNext

सोशल मीडियावर सध्या लग्नाशी संबंधित अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ तर एवढे गमतीदार असतात की, त्यांना पाहिल्यावर आपल्याला हसू आवरता येत नाही. दरम्यान लग्नातील असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून पाहणारे अवाक झाले आहेत. या व्हिडीओमध्ये एक माकड लग्नाच्या मंडपात घुसून आपल्या मर्कटलीलांनी धमाल उडवताना दिसत आहे. 

लग्नासारख्या सोहळ्यासाठी संपूर्ण कुटुंब अनेक दिवसांपासून तयारी करत असते. हा क्षण वधू-वरांसाठी खूप खास असतो. हा सोहळा कायम स्मरणात राहावा, असं त्यांना वाटतं. मात्र यादरम्यान, अशा काही घटना घडतात की ज्यामुळे त्याची लग्नापेक्षा चर्चा होते.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये वधूवर एकमेकांसमोर बसलेले आहेत. लग्नातील काही विधी सुरू आहेत. त्याचदरम्यान तिथे एक माकड येतो. तो आपल्या मर्कटलीला दाखवत तेथील काही धान्य पळवून नेतो.
हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर एका युझरने शेअर केला आहे. त्यावर लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. एका युझरने लिहिले की, खरोखरच असं पहिल्यांदाच पाहिलं. यात नवरदेवाची फजिती झाली. मात्र लग्नात घुसलेले हे माकड चर्चेचा विषय ठरलं.

Web Title: Marriage: A monkey entered the wedding hall, did something like that while the ceremony was going on...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.