Marriage: एकाच मंडपात वराने दोन वधूंशी बांधली लग्नगाठ, वऱ्हाड्यांनी दिला असा आशीर्वाद 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 01:31 PM2022-06-20T13:31:49+5:302022-06-20T13:32:35+5:30

Marriage: मंडप एक, वर एक आणि वधू दोन. या दोन्ही वधूंचा एकाच वराशी विवाह झाल्याची अजब घटना समोर आली आहे. झारखंडमधील लोहरदगा येथे हा अजब विवाह सोहळा संपन्न झाला. उल्लेखनीय बाब म्हणजे हा विवाह सोहळा कुटुंबीय आणि समाजाच्या मान्यतेने पार पडला.

Marriage: The bridegroom tied the knot with two brides in the same tent, the blessing given by the bridegroom | Marriage: एकाच मंडपात वराने दोन वधूंशी बांधली लग्नगाठ, वऱ्हाड्यांनी दिला असा आशीर्वाद 

Marriage: एकाच मंडपात वराने दोन वधूंशी बांधली लग्नगाठ, वऱ्हाड्यांनी दिला असा आशीर्वाद 

googlenewsNext

रांची - मंडप एक, वर एक आणि वधू दोन. या दोन्ही वधूंचा एकाच वराशी विवाह झाल्याची अजब घटना समोर आली आहे. झारखंडमधील लोहरदगा येथे हा अजब विवाह सोहळा संपन्न झाला. उल्लेखनीय बाब म्हणजे हा विवाह सोहळा कुटुंबीय आणि समाजाच्या मान्यतेने पार पडला. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या ज्येष्ठ मंडळींनी त्यांना आशीर्वाद दिले. उल्लेखनीय बाब म्हणजे या जोडप्याची मुलंही आई-वडिलांसोबत लग्नाला उपस्थित होती.

हा अजब विवाह सोहळा लोहरदजा जिल्ह्यातील भंडरा येथे संपन्न झाला. येथील बंडा गावामध्ये संदीप उरांव नावाचा तरुण राहतो. त्याचं दोन तरुणींसोबत प्रेमप्रकरण सुरू होतं. त्यावरून समाजामध्ये खूप वाद विवाद होत असत. संदीपची एक प्रेयसी कुसूम ही धानमुंजी गावातील रहिवासी आहे. ते तीन वर्षांपासून एकमेकांवर प्रेम करत आहेत. कुसूमला लग्नाआधीच संदीपपासून एक मुलगा झाला आहे. लग्नावेळी तो तिथेच खेळत होता.  

दरम्यान, संदीपची दुसरी वधू बनलेली तरुणी स्वाती कुमारी आहे. वर्षभरापूर्वी बंगालमधील विट भट्टीवर काम करत असताना संदीप आणि ती एकमेकांच्या प्रेमात पडले होते. दरम्यान दोन तरुणींसोबतच्या प्रेमप्रकरणामुळे खूप वादही झाले. अखेर ग्रामस्थांनी पंचायत बोलावून दोन्ही तरुणींचा विवाह संदीपसोबत करून घेण्याच निर्णय घेतला. 

त्यानंतर रविवारी दोन्ही तरुणींचा विवाह संदीपसोबत लावून देण्यात आला. त्यावेळी दोन्ही वधू आणि संदीपच्या कुटुंबीयांसोबत ग्रामस्थही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. त्यांनी या एक वर आणि दोन वधूंना आशीर्वाद दिले.  

Web Title: Marriage: The bridegroom tied the knot with two brides in the same tent, the blessing given by the bridegroom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.