आजीच्या वयाच्या महिलेशी विवाह
By admin | Published: April 25, 2017 12:41 AM2017-04-25T00:41:42+5:302017-04-25T00:42:30+5:30
देशादेशात बालविवाहांना बंदी असली तरी हे प्रकरण तर त्याहीपेक्षा गुंतागुंतीचे आहे. साधारणत: वर आणि वधू यांच्या वयाचे अंतर सहा महिने ते काही वर्षांचे असते
देशादेशात बालविवाहांना बंदी असली तरी हे प्रकरण तर त्याहीपेक्षा गुंतागुंतीचे आहे. साधारणत: वर आणि वधू यांच्या वयाचे अंतर सहा महिने ते काही वर्षांचे असते; परंतु येथे ८ वर्षांच्या मुलाने त्याच्या आजीच्या वयाच्या महिलेशी विवाह केला. या महिलेला आधीच पाच मुले आहेत. दक्षिण आफ्रिकेतील श्वान येथे हे लग्न झाले. शाबानगू यांचे वय ६१ असून, त्यांचे ८ वर्षांच्या सानेले मॅसिलेला याच्याशी लग्न झाले.
सोनेला हा शाळेत जाणारा असून, लग्नाची अंगठी एकमेकांना घालण्याचा कार्यक्रम १०० पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडला. या विलक्षण लग्नाबद्दल मॅसिलेलाची आई पैशेंस यांनी सांगितले की मॅसिलेलाच्या आजोबांची शेवटची इच्छा होती की, मॅसिलेलाचे लग्न आपण जगाचा निरोप घ्यायच्या आधी व्हावे. आपली ही इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी आपल्या मुलाचे लग्न केले. पैशेंस यांनी सांगितले की, माझ्या सासूने म्हटले होते की, त्यांनी मॅसिलेलाचे लग्न केले नाही तर त्यांचे कुटुंब कोणत्या ना कोणत्या अडचणीत येईल. त्यामुळे हे लग्न केवळ परंपरेच्या आधाराने केले असून त्याला कोणताही कायदेशीर आधार नाही.