विवाहित कपलने दात, डोळे, नाक, कानासहीत पूर्ण शरीरावर बनवले टॅटू, वर्ल्ड रेकॉर्ड केला नावावर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 09:51 AM2022-11-24T09:51:16+5:302022-11-24T09:52:54+5:30
विक्टर ह्यूगो पेराल्टावे वर्ल्ड रेकॉर्डबाबत सांगितलं की, आपलं लाइफ एन्जॉय करावं, कलेचा आनंद घ्या. टॅटू तुम्हाला चांगला किंवा वाईट व्यक्ती बनवत नाही.
Tattoo Argentina Couple: अर्जेंटीनाचं एक कपल गॅब्रिएला पेराल्टा (Gabriela Peralta) आणि विक्टर ह्यूगो पेराल्टा (Victor Hugo Peralta) यांनी सगळ्यात जास्त बॉडी मॉडिफिकेशनसाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड (Guinness World Record) बनवला आहे. दोघांनाही बॉडी मॉडिफिकेशनची फार आवड आहे आणि दोघांनी जवळपास 98 टॅटू आणि बॉडी मॉडिफिकेशन केले आहेत. विक्टर ह्यूगो पेराल्टावे वर्ल्ड रेकॉर्डबाबत सांगितलं की, आपलं लाइफ एन्जॉय करावं, कलेचा आनंद घ्या. टॅटू तुम्हाला चांगला किंवा वाईट व्यक्ती बनवत नाही. ही केवळ एक कला आहे. काही लोकं याचं कौतुक करतील. तर काही लोकांना हे आवडणार नाही.
या कपलने डोळ्यांच्या पांढऱ्या भागातही मॉडिफिकेशन केलं आहे. ज्यामुळे त्यांचे डोळे काळ्या रंगाचे झाले आहेत. त्याशिवाय 50 पियर्सिंग, 8 मायक्रोडर्मल, 14 बॉडी इम्प्लांट्स, 5 डेंटल इम्प्लांट्स, 4 ईयर एक्सपेंडर, 2 ईयर बोल्ट आणि एक काटेदार जीभही आहे. दोघांची ही अजब आवड पाहून अनेकांनी त्यांना वाईट म्हटलं आहे. वर्ल्ड रेकॉर्डबाबत ते म्हणाले की, गॅब्रिएला आणि विक्टर जवळपास 24 वर्षाआधी अर्जेंटीनामधील एका बाइक इव्हेंटमध्ये भेटले होते. ज्यानंतर दोघांचं आयुष्य बदललं.
दोघांनी सांगितलं की, दोघांनी सांगितलं की, जेव्हा दोघांनी एकमेकांना बघितलं तेव्हाच ते एकमेकांच्या प्रेमात पडले. तेव्हाच त्यांना जाणवलं की, दोघेही इम्प्लांट्स आणि बॉडी मॉडिफिकेशनची आपली आवड जोपासतील. यातील काही मॉडिफिकेशन फार वेदनादायी होते. कपलचं मत आहे की, बॉडी मॉडिफिकेशन कलात्मक अभिव्यक्तीचं प्रतीक आहे.