असा देश जिथे पुरूषांना दोन लग्न करणं असतं बंधनकारक, न केल्यास होते शिक्षा!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2024 04:55 PM2024-09-21T16:55:20+5:302024-09-21T17:15:19+5:30
तुम्हाला हे माहीत नसेल की, जगात असाही एक देश आहे जिथे पुरूषांना दोन लग्न करणं बंधनकारक असतं.
असा देश जिथे पुरूषांना दोन लग्न करणं असतं बंधनकारक, न केल्यास होते शिक्षा!
सामान्यपणे जास्तीत जास्त लोक आयुष्यात एकच लग्न करतात. पण याबाबतही वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळे नियम आहेत. काही लोक दोन किंवा त्यापेक्षा जास्त लग्न करतात. पण असं करणं त्यांना बंधनकारक असतंच असं नाही. मात्र, तुम्हाला हे माहीत नसेल की, जगात असाही एक देश आहे जिथे पुरूषांना दोन लग्न करणं बंधनकारक असतं. त्याहून महत्वाची बाब म्हणजे एखाद्या पुरूषाने जर दोन लग्न करण्यास नकार दिला तर त्यांना कठोर शिक्षाही होते.
आफ्रिका महाद्वीपाच्या देशांमध्ये लग्नाबाबत वेगवेगळे कायदे आहेत. पण हे कायदे दुसऱ्या कोणत्याच देशात नाहीत. इथे पुरूषांना दोन लग्न करणं बंधनकारक आहे. जर एखाद्या व्यक्तीने दोन लग्न करण्यास नकार दिला तर त्याला कठोर शिक्षा दिली जाते. इरीट्रिया असं या आफ्रिकन देशाचं नाव आहे . इथे पुरूषांना दोन लग्न करणं अनिवार्य आहे. मग ते आनंदाने करा किंवा दु:खी मनाने.
इरीट्रिया देशात दोन लग्न करणं बंधनकारक आहे. जर कुणी दोन लग्न करण्यास नकार दिला किंवा दोन पत्नी ठेवण्यास नकार दिला तर त्या व्यक्ती विरोधात कठोर कारवाई केली जाते. या व्यक्तीला आयुष्यभर तुरूंगातही रहावं लागू शकतं.
दोन लग्नाचं कारण..
इरीट्रिया देशात महिलांमुळे हा कायदा बनवण्यात आला आहे. इरीट्रिया देशात पुरूषांपेक्षा महिलांची संख्या जास्त आहे. इरीट्रियाचं इथियोपियासोबत गृहयुद्ध सुरू आहे. ज्यामुळे इथे महिलांची संख्या जास्त आहे.
सर्वात हैराण करणारी बाब म्हणजे या देशात महिलांसाठीही कठोर कायदे आहेत. इथे महिला पतीला दुसरं लग्न करण्यापासून रोखूही शकत नाही. जर त्यांनी पतीच्या दुसऱ्या लग्नावर आक्षेप घेतला तर त्यांनाही तुरूंगात टाकलं जातं.