हे गणित ५ वर्षाचं मुल सहज सोडवु शकत पण मोठ्यांसाठी जवळजवळ अशक्य! का? घ्या जाणून
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 03:55 PM2022-05-11T15:55:53+5:302022-05-11T15:59:46+5:30
एक प्रश्न सध्या सोशल मिडियावर व्हायरल होतो आहे. वरकरणी जरी हा प्रश्न सोपा वाटत असला तरी अनेकांना या प्रश्नाचे उत्तर सापडत नाहीये. मुख्य म्हणजे अगदी ५ वर्षाचं मुलंही हा प्रश्न अगदी सहज सोडवू शकतो.
सोशल मिडियावर अनेक प्रकारचे संभ्रमात टाकणारे प्रश्न व्हायरल होत असतात. हे प्रश्न सोडवायला अनेकांना मजा येते. वेळ घालवण्यासाठी अनेकजण असे प्रश्न सोडवतात. यापैकी अनेक प्रश्नांची उत्तर सहज आणि सोपी असतात. मात्र काहीवेळा हे प्रश्न भल्याभल्यांची भंबेरी उडवतात. असाच एक प्रश्न सध्या सोशल मिडियावर व्हायरल होतो आहे. वरकरणी जरी हा प्रश्न सोपा वाटत असला तरी अनेकांना या प्रश्नाचे उत्तर सापडत नाहीये. मुख्य म्हणजे अगदी ५ वर्षाचं मुलंही हा प्रश्न अगदी सहज सोडवू शकतो.
हा फोटो तुम्ही नीट पाहिला तर ४ अंकी क्रमांकासमोर एक अंकी क्रमांक लिहिलेला आहे. आता याचा अर्थ काय? हे गणित नेमकं कसं सोडवावं असा प्रश्न तुम्हाला पडेल. या ४ अंकी क्रमांकांचा आणि त्याच्या बाजुला लिहिलेल्या एक अंकी क्रमांकाचा ताळमेळ लागत नसल्याचं तुमच्या लक्षात येईल पण फोटोवर तर असं लिहिलंय की प्री स्कुल म्हणजेच पाच वर्षाच्या आतील मुलही हे गणित ५ ते १० मिनिटांच्या आत सोडवू शकतो.
चला आता तुमच्यासाठी आम्ही या प्रश्नाचं उत्तर सोपं करुन सांगतो. या प्रत्येक क्रमांकात जिथे शुन्य आकार दिसतो आहे तो शुन्य आकार शुन्य म्हणून धरुन त्याची बेरीज म्हणजे या प्रश्नाच उत्तर. उदाहरणार्थ 2581= 2 या संख्येत 8 या अंकात दोन शुन्य आले आहेत. त्याची बेरीज होते 2 म्हणून या प्रश्नाचं उत्तर 2. आता तुमच्या लक्षात आलंच असेल. प्री स्कुलमधील मुलांना गंमत म्हणून अशी कोडी दिली जातात. ते ती या ट्रिकने सहज सोडवतात.