गणिताचा जुगाड करून एक-दोन नाही तर 14 वेळा जिंकला जॅकपॉट, 2.5 अब्ज रूपये कमावले!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2023 11:47 AM2023-06-08T11:47:31+5:302023-06-08T11:48:59+5:30
एक व्यक्ती असाही आहे ज्याने आयुष्यात एक-दोन वेळा नाही तर 14 वेळा जॅकपॉट आपल्या नावावर केला. त्याने इतके पैसे जिंकले ज्यांचा त्याने कधी विचारही केला नसेल.
आयुष्यात वेगवेगळ्या समस्या असल्या की, एकदा तरी असं वाटतं एखादी लॉटरी लागावी आणि सगळ्या दूर व्हाव्या. पण सगळ्यांच्या नशीबात हे नसतं. जास्तीत जास्त लोकांसाठी हे स्वप्नच राहतं. एका रिपोर्टनुसार, 1.4 लोकांपैकी एकच कुणीतरी लॉटरी जिंकू शकतो. तेही त्यांच्या आयुष्यात केवळ एकदाच. पण एक व्यक्ती असाही आहे ज्याने आयुष्यात एक-दोन वेळा नाही तर 14 वेळा जॅकपॉट आपल्या नावावर केला. त्याने इतके पैसे जिंकले ज्यांचा त्याने कधी विचारही केला नसेल.
रोमानियामध्ये जन्मलेला ऑस्ट्रेलियन नागरिक आणि गणितज्ञ स्टीफन मंडेल यांनी हा कारनामा केला आहे. आपल्या बुद्धीने गणित करून त्यांनी लॉटरी सिस्टीमला हॅक केलं. त्यामुळे जेव्हाही ते लॉटरी खरेदी करत होते तेव्हा अंदाज लावत होते. जो बरोबर निघत होता. तेही छोटी रक्कम नाही तर थेट लॉटरीचा जॅकपॉट.
एका खास फार्मूल्याचा वापर करत ते 5 नंबर काढत होते आणि सहाव्या नंबरचा अंदाज लावून योग्य तिथे पैसे लावत होते. त्यांची पहिली लॉटरी इतकी मोठी लागली की, ते रोमानिया सोडून आपल्या परिवारासोबत ऑस्ट्रेलियामध्ये शिफ्ट झाले.
ऑस्ट्रेलियात एकापाठी एक 12 लॉटरी लागल्या
स्टीफन मंडेल यांनी नोकरी दरम्यान जास्त पैसे कमावण्यासाठी 1960 मध्ये लॉटरी लावणं सुरू केलं. ऑस्ट्रेलियामध्ये पोहोचून त्यांनी रोमानिया, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेत लॉटरी खरेदी केल्या. प्रत्येक वेळी ते जिंकले. झालं असं की, लॉटरीचे अधिकारी हैराण झाले. त्यांनी मंडेल यांना रोखण्यासाठी कठोर नियम तयार केले. एका व्यक्तीकडून सगळे तिकिट खरेदी करण्यावर बंदी घातली. पण याचा काही फायदा झाला नाही. स्टीफन यांच्या एकापाठी एक लॉटरी लागल्या. ऑस्ट्रेलियामध्ये त्याच्या एकापाठी एक 12 लॉटरी लागल्या.
नियम कठोर झाले तेव्हा लॉटरी फर्म उभारली
जेव्हा नियम कठोर झाले तेव्हा मंडेल यांनी एक लॉटरी फर्म उभारली. तेव्हा त्यांना समजलं की, अमेरिकेत असे कठोर नियम नाहीयेत. ते अमेरिकेत जाऊन लॉटरी खरेदी करू लागले. अनेक लोकांना सोबत घेऊन ते लॉटरी तिकीट खरेदी करत होते. ते जे नंबर सांगत होते त्यातील एकना एक नंबर येत होता. अशाप्रकारे एका मोठी लॉटरी त्यांच्या नावे होत होती.
अमेरिकेत लॉटरीतून त्यांनी 3 कोटी रूपये कमावले. व्हर्जिनियामध्ये सगळ्यात मोठा जॅकपॉट जिंकला. यादरम्यान त्यांच्यावर फसवणुकीचा आरोप लागला आणि 20 महिने तुरूंगातही रहावं लागलं. पण ते थांबले नाहीत.