मच्छीमारांच्या समृद्धीसाठी महापौरांचे मगरीशी लग्न
By admin | Published: July 6, 2017 02:06 AM2017-07-06T02:06:43+5:302017-07-06T02:06:43+5:30
स्थानिक मच्छिमारांना चांगले दिवस यावेत यासाठी मेक्सिकोच्या महापौरांनी जुन्या परंपरेनुसार मादी मगरीशी लग्न केले. या मगरीचे नाव २९ जून
मेक्सिको : स्थानिक मच्छिमारांना चांगले दिवस यावेत यासाठी मेक्सिकोच्या महापौरांनी जुन्या परंपरेनुसार मादी मगरीशी लग्न केले.
या मगरीचे नाव २९ जून रोजी ‘प्रिन्सेस’ असे ठेवण्यात आले. तिला विवाहाचे कपडे नेसवण्यात आले होते व लग्नाच्या दिवशी शुक्रवारी तिचा जबडा पट्टीने बंद करण्यात आला होता. लग्नाआधी मगरीची रस्त्यांवरून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात येणार असल्यामुळे तिच्या चेहऱ्यावर घुंगटही घालण्यात आला होता.
मिरवणुकीनंतर महापौर सॅन पेड्रो ह्युअमेल्युला व्हिक्टर यांचे तिच्याशी टाऊन हॉलमध्ये लग्न लावले गेले. १७८९ पासून ही परंपरा चोंतल इंडीयन्स पाळत आले असून त्यानुसार लग्न विधीचा भाग म्हणून मगरीला बांधून ठेवण्यात आले होते. या लग्नामुळे स्थानिक मच्छिमारांसह प्रशांत महासागराच्या किनाऱ्याला चांगले दिवस येतील व त्यांची भरभराट होईल अशी श्रद्धा आहे. स्थानिक परंपरेनुसार मगरीला राजकन्या समजले जाते व ती त्यांना शांतता आणि समृद्धी देईल, असा विश्वास आहे.