अंडरवर्ल्डमध्ये हत्या करण्याच्या contract ला ‘सुपारी’ का म्हणतात? काय आहे यामागचं कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 05:15 PM2022-12-15T17:15:46+5:302022-12-15T17:16:34+5:30

Supari In Mumbai Underworld: अंडरवर्ल्डमध्ये सुपारीचा वापर मर्डरच्या contract साठी केला जातो. पण हा शब्द केवळ मर्डरसाठी लिमिटेड नाही. सुपारी या शब्दाचा वापर अनेक कामांसाठी केला जातो.

Meaning of supari in Mumbai underworld, know the answer | अंडरवर्ल्डमध्ये हत्या करण्याच्या contract ला ‘सुपारी’ का म्हणतात? काय आहे यामागचं कारण...

अंडरवर्ल्डमध्ये हत्या करण्याच्या contract ला ‘सुपारी’ का म्हणतात? काय आहे यामागचं कारण...

googlenewsNext

Supari In Mumbai Underworld: तुम्ही सिनेमा किंवा न्यूजमध्ये मर्डरसाठी एक शब्द ऐकला असेल ‘सुपारी’. तुम्ही कधीना कधी विचार केला असेल की, सुपारी तर पानात खाल्ली जाते. मग याचा वापर मर्डरसाठी केला जातो? आज आम्ही तुम्हाला याच प्रश्नाचं उत्तर देणार आहोत आणि सांगणार आहोत की, माफियांमध्ये सुपारी शब्द इतका फेमस का आहे?

सुपारीचा अर्थ काय आहे?

अंडरवर्ल्डमध्ये सुपारीचा वापर मर्डरच्या contract साठी केला जातो. पण हा शब्द केवळ मर्डरसाठी लिमिटेड नाही. सुपारी या शब्दाचा वापर अनेक कामांसाठी केला जातो. मुंबई पोलिसचे रिटायर्ड ACP वसंत ढोबळे यांनी सांगितलं की, ग्रामीण महाराष्ट्रातील लोकांमध्ये लग्नाची पत्रिका देण्याऐवजी पान आणि सुपारीसोबत लग्नात बोलवण्याची प्रथा आहे. तसेच लग्न जुळलं तर त्यावेळी साक्ष म्हणून सुपारी फोडली जाते. अनेक भागात पान आणि सुपारी देऊन लोकांना लग्नासाठी आमंत्रित केलं जातं. 

नंतर कोणत्याही डील किंवा contract साठी सुपारी शब्दाचा वापर करण्यात येऊ लागला. जसे की, एखादा करार ठरणे, टोकन पैसे घेणे असो त्यालाही सुपारी घेणं असंच बोललं जाऊ लागलं होतं. कोणतीही डील पक्की झाली तर मराठीत ‘कामाची सुपारी आली आहे’ असं बोललं जाऊ लागलं होतं.
केवळ माफियाच नाही तर पोलिसही सुपारी शब्दाचा वापर करत होते. महाराष्ट्रात हा काही अधिकृत शब्द नाही. 

द इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या एका मुलाखतीत ते म्हणाले की, 'त्यावेळी जास्तीत जास्त अधिकारी हे  ग्रामीण भागातील होते आणि ते हा शब्द वापरत होते. ते म्हणत होते की, ‘याची सुपारी त्याने दिली.’ मग नंतर जेव्हा अंडरवर्ल्ड शिखरावर होतं तेव्हा हा शब्द सगळीकडे ऐकायला मिळत होता.

इंटरेस्टींग आहे याचा इतिहास

‘Dongri to Dubai: Six Decades of the Mumbai Mafia’ हे एक पुस्तक आलं होतं. ज्याचे लेखक एस.हुसैन ज़ैदी आहेत. त्यांनी सांगितलं की, माहेमी ट्राइबचे चीफ भीमच्या एका परंपरेमुळे सुपारी शब्द चलनात आला. जेव्हाही कोणतं कठीण काम होतं तेव्हा भीम सगळ्याच योद्द्ध्यांची एक मीटिंग बोलवत होता. 

त्यानंतर त्यांच्यासमोर एका भांड्यात एक सुपारी किंवा पान ठेवत होता. यातून जे कुणी सुपारी उचलत होते, याचा अर्थ हा होत होता की, त्याने हे काम घेतलं. म्हणजे सुपारी याचा पुरावा होता की, त्या व्यक्तीने हे काम घेतलं. तेव्हापासूनच सुपारीची परंपरा चालत आली आहे.

Web Title: Meaning of supari in Mumbai underworld, know the answer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.