अरे देवा! वॅनमध्ये 320 उंदरांसोबत राहत होती महिला; पण का?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2019 04:09 PM2019-10-21T16:09:43+5:302019-10-21T16:10:08+5:30

घरामध्ये एखादी पाल किंवा उंदीर चुकून घरात दिसला तरी आपली तारांबळ उडते. उंदीर घरातून जाईपर्यंत झोपच लागत नाही. पण एक महिला चक्क 320 उंदरांसोबत राहत होती.

Meet this california woman who found living in van with over 300 pet rats | अरे देवा! वॅनमध्ये 320 उंदरांसोबत राहत होती महिला; पण का?

अरे देवा! वॅनमध्ये 320 उंदरांसोबत राहत होती महिला; पण का?

Next

घरामध्ये एखादी पाल किंवा उंदीर चुकून घरात दिसला तरी आपली तारांबळ उडते. उंदीर घरातून जाईपर्यंत झोपच लागत नाही. पण एक महिला चक्क 320 उंदरांसोबत राहत होती. सॅन डियागो ह्यूमन सोसायटी एक एनजीओ असून त्यांच्याकडे महिलांच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांनी तक्रार केली. त्यानंतर हे प्रकरण समोर आलं. 

महिलेचं कुठेच घर नाही

सुरुवातीच्या तपासणीमध्ये असं दिसून आलं की, महिला बेघर आहे आणि ती त्या वॅनमध्येच राहत होती. महिलेचं नाव कार्ल आहे. 

आधी फक्त दोन उंदिर होते

चौकशीमध्ये असं समजलं की, कार्लकडे आधी फक्त दोनच उंदिर होते. जॅकब आणि रिचेल असं त्यांचं नाव होतं. हळूहळू उंदरांच्या या जोडप्याने पिल्लांना जन्म दिला आणि असं करत करत 320 उंदरांसोबत महिला राहू लागली. कार्ल या सर्व उंदरांना आपल्या वॅनमधील पिंजऱ्यांमध्ये ठेवत असे. 

कोणीतरी दान केली होती गाडी

कार्ल ज्या वॅनमध्ये राहत होती, ती तिला कोणीतरी डोनेट केली होती. एवढचं नाहीतर कार्लला काही लोक देणगी देत असतं. डॅन कूक जे एका संस्थेमध्ये राहत होते, ते सांगतात की, हे प्रकरण कोणत्याही प्रकारच्या अ‍ॅनिमल क्रुएलिटीच्या लिस्टमध्ये येत नाही. 

Web Title: Meet this california woman who found living in van with over 300 pet rats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.