सलाम! ६ लाख गोर-गरिबांचं पोट भरण्यासाठी 'या' कुटुंबानं १२० दिवसात खर्च केले २ कोटी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2021 02:18 PM2021-01-04T14:18:51+5:302021-01-04T14:31:36+5:30
Trending Viral News in Marathi : १५ ठिकाणांमध्ये जवळपास ६० हजारांपेक्षा जास्त लोकांना माहामारीमुळे उपासमारीचा सामना करावा लागत होता.
(Image Credit- New Indian Express)
भूकेलेल्यांना अन्न पुरवण्यासारखं चांगले काम खूप कमी लोकांकडून होताना दिसून येतं. आजही तुम्ही पाहू शकता दोनवेळचं अन्न मिळवण्यासाठी लोकांना काय काय करावं लागतं. तेव्हा कुठे चार पैसै हातात मिळतात. श्री चंद्रशेखर गुरू पादुका पीठम आणि श्री रामायण नवन्निका यज्ञ ट्रस्टने आंध्र प्रदेशातील तेनालीमध्ये एक आदर्श उदाहरण ठेवलं आहे. विष्णुभटला अंजनिया च्यानुलु नावाच्या गृहस्थानं २७ वर्षांपूर्वी या ट्रस्टची स्थापना केली होती. या ट्रस्टमध्ये त्यांच्या सगळ्या कुटूंबियांचा समावेश आहे.
गोरगरिबांना मदत करण्यासाठी त्यांनी या ट्रस्टची स्थापना केली होती. लॉकडाऊनच्या काळात सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी जास्तीत जास्त लोकांना जेवण पुरवण्याचा निर्णय घेतला. सुरूवातीला त्यांनी झोपटपट्टीत राहत असलेल्या लोकांना ५० किलो जेवण द्यायला सुरूवात केली. इतकं करूनही त्याचं समानाध झालं नाही. सगळ्या गरजवंत रहिवासींना जेवण देता यावं, यासाठी त्यांच्या भावानं १५ ठिकाणींचा शोध घेतला. १५ ठिकाणांमध्ये जवळपास ६ हजारांपेक्षा जास्त लोकांना माहामारीमुळे उपासमारीचा सामना करावा लागत होता.
खरं की काय? रोज ११५ समोसे अन् १२ लीटर कोल्डड्रिंक्स प्यायचा, बटर चिकन खाता खाता आलं मरण
विष्णूभटला यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ''लोकांची होणारी उपासमार लक्षात आल्यानंतर आम्ही आमच्या परिसरातील काही आचार्यांकडे गेलो. ज्यांना लॉकडाऊनमुळे हाताला काहीच काम नव्हते. पण ते काम करण्यास उत्सूक होते. त्यानंतर या कामगारांना कामावर ठेवून त्या १५ ठिकाणांमध्ये जेवण वाटण्यास सुरूवात केली. ''
बोंबला! कोरोनाची लस घ्यायला आलेल्या तरूणालाच नर्सनं केलं प्रपोज; पाहा व्हायरल व्हिडीओ
रोज १० हजार लोकांना रोज जेवण दिलं जातं होतं
लॉकडाऊनच्या काळात त्याच्या टीमकडून रोज १००० किलो भात आणि ४०० किलो भाजी, सांभार तयार करून जवळपास ८ हजार ते १० हजार लोकांमध्ये वाटप केले जात होते. ६२ दिवसांत १ लाख रूपये कामगार आणि वाहतुकीवरच खर्च झाला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण व्यवस्थेसाठी एकूण २ कोटी रुपयांचा खर्च आला. या कामासाठी स्थानिक चित्रपट दिग्दर्शक हरिश शंकर आणि राजकीय नेत्यांनीही मदत केली होती.