अरे व्वा! लोकांनी टाकून दिलेल्या मास्कपासून लाखो रुपयांच्या वीटा तयार करतो 'हा' अवलिया

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 05:58 PM2020-08-20T17:58:51+5:302020-08-20T18:12:32+5:30

येत्या काळात पीपीई आणि मास्कमुळे निर्माण होणाऱ्या कचऱ्याचं प्रमाण वाढल्यास समस्या उभी राहू शकते.

Meet this man binish desai who recyle corona biomedical waste | अरे व्वा! लोकांनी टाकून दिलेल्या मास्कपासून लाखो रुपयांच्या वीटा तयार करतो 'हा' अवलिया

अरे व्वा! लोकांनी टाकून दिलेल्या मास्कपासून लाखो रुपयांच्या वीटा तयार करतो 'हा' अवलिया

Next

प्लास्टीकपासून तयार होणारा कचरा मोठं आव्हान बनलं आहे. त्यात आता कोरोनाकाळात मास्कचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्यानं मास्कमुळे तयार होत असलेला कचऱ्याची कशी विल्हेवाट लावायची असा नवीन प्रश्न निर्माण झाला आहे.  येत्या काळात पीपीई आणि मास्कमुळे निर्माण होणाऱ्या कचऱ्याचं प्रमाण वाढल्यास समस्या उभी राहू शकते. अशा स्थितीत कचरा रिसायकल केल्यास आपण या समस्येपासून सुटका मिळवू शकतो. आज आम्ही तुम्हाला अशा गृहस्थाबद्दल सांगणार आहोत. जे प्लास्टिकच्या कचऱ्यापासून वीटा तयार करण्याचं काम करतात.

या गृहस्थाचं नाव बिनिश देसाई असं आहे. या  बिनिश यांच्या कामामुळे यांना रिसायकलमॅन असं म्हटलं जात आहे. हे BDdreams या कंपनीचे संस्थापक आहेत. इंडस्ट्रीअल वेस्टला सस्टेनेबल बिल्डींगचे साहित्य तयार करण्यासाठी या तंत्राचा वापर करतात. द बेटर इंडीयानं दिलेल्या माहितीनुसार बिनिश Pblock 2.0 नावाची वीट तयार करत आहेत. ही वीट कोरोना विषाणूपासून बचावसाठी वापरात असलेल्या बायोमेडिकल वेस्टपासून तयार  होते. 

अनेकजण मास्कचा वापर एकदाच करतात. Central Pollution Control Board नं दिलेल्या माहितीनुसार भारतात दिवासाला 101मिट्रीक टन बायोमेडिकल कचरा निर्माण होतो.  सध्या कोरोनाच्या माहामारीमुळे या कचऱ्याचं प्रमाण वाढलं आहे. बिनिश यांनी सांगितले की,  ''जास्तीत जास्त लोक मास्कचा एकदाच वापर करतात. त्यामुळे या कचऱ्यापासून वीटा तयार केल्या जाव्यात अशी कल्पना मला सुचली. '' या वीटा वॉटरप्रुफ आहेत. Pblock 2.0  वीट तयार करण्यासाठी 52 टक्के पीपीई मटेरिअल,  45 टक्के ओले कागदांचा वापर करण्यात आल्या आहेत.  या वीटांची किंमत २.८ लाख रुपये इतकी आहे. 

हे पण वाचा-

खुशखबर! ८० टक्के कोरोनाबाधित रुग्णांमुळे इतरांना संसर्गाचा धोका नाही, संशोधनातून खुलासा

निरोगी राहण्यासाठी रोज किती चालायला हवं? जाणून घ्या ५ ते ६० वर्ष वयोगटाचा प्रभावी 'वॉक प्लॅन'

Web Title: Meet this man binish desai who recyle corona biomedical waste

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.