वाह, कमाल! फोटोग्राफरनं उभा केला कॅमेराचा बंगला; एका मुलाचं नाव ठेवलं Cannon तर दुसऱ्याचं...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2020 11:01 AM2020-07-13T11:01:11+5:302020-07-13T11:25:28+5:30
तुम्ही अनेक अलिशान घरं पाहिली असतील पण कॅमेराच्या आकाराचं घर कधी पाहिलंय का? होय आज आम्ही तुम्हाला अशाच एका आवलिया बद्दल सांगणार आहोत.
प्रत्येक माणसात एक कला दडलेली असते. कोणाला नृत्यकला आवडते, कोणाची संवाद कौशल्य चांगली असतात. तर कोणाला चांगली पृथ्वीवरील सारं काही कॅमेरात टिपण्याची आवड असते. काही लोक आपली आवड जोपासण्यासाठी खूप प्रयत्न करतात. त्यांच्या जगण्याच्या पद्धतीतून याचे प्रतिबिंब दिसून येते. आजपर्यंत तुम्ही अनेक अलिशान घरं पाहिली असतील पण कॅमेराच्या आकाराचं घर कधी पाहिलंय का? होय आज आम्ही तुम्हाला अशाच एका आवलिया बद्दल सांगणार आहोत.
माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार या फोटोग्राफरचं नाव रवी होंगल आहे. रवी यांना फोटोग्राफीची इतकी आवड आहे. की त्यांनी आपलं संपूर्ण घर कॅमेराप्रमाणे तयार केलं आहे. रवी कर्नाटकातील बेलगाममध्ये राहत असून सुरूवातीपासूनच त्यांना फोटोग्राफीची खूप आवड होती. म्हणून त्यांनी स्वतःच्या कुटुंबासाठी कॅमेराप्रमाणे घर उभारण्यांच ठरवलं. लांबून पाहिल्यानंतर हे घर एखादा कॅमेरा उभा केल्याप्रमाणेच दिसते. तुम्ही आत्तापर्यंत कॅमेराच्या आकाराचा केक पाहिला असेल पण कॅमेराच्या आकाराचे घर पहिल्यांदाच पाहात असाल.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता कॅमेराच्या आकाराचं अलिशान घर त्यांनी उभं केलं आहे. आणि आपल्या कुटुंबासमवेत त्यांनी हा फोटो शेअर केला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. फोटोग्राफर रवी यांनी तीन मुलं आहे. तुमचा विश्वास बसणार नाही पण तीन्ही मुलांची नाव कॅमेरा आणि फोटोग्राफी यांच्याशी निगडीत ठेवली आहे. त्यातील तीन्ही मुलांची नाव Epson, Canon आणि Nikon अशी आहेत. यावरून रवी यांना असलेले फोटोग्राफीचं वेड दिसून येत आहे.
'या' देशात लसीच्या मानवी चाचणीला सप्टेंबरमध्ये सुरुवात होणार; जाणून घ्या लस बाजारात कधी येणार
एसीमुळे पसरतंय कोरोनाचं संक्रमण; संसर्गापासून बचावासाठी तज्ज्ञांनी सांगितल्या 'या' टिप्स