वाह मानलं! लठ्ठपणाला कंटाळून जीम जायला लागलं हे जोडपं अन् मग...; फोटो पाहून आजपासूनच जीमला जाल
By manali.bagul | Published: February 8, 2021 07:55 PM2021-02-08T19:55:35+5:302021-02-08T20:05:20+5:30
Inspirational Stories in Marathi : आदित्य आणि गायत्री शर्मा हे दोघे आपल्या शरीरयष्टीमुळे अजिबात खूश नव्हते. म्हणून त्या दोघांनीही फीट होण्याचा विचार केला.
लठ्ठपणामुळे लोकांना अनेकदा न्यूनगंड येतो. आपण चांगले दिसत नाही किंवा बारीक शरीरयष्टी कशी होईल याचा विचार अनेकजण करतात. पण लठ्ठपणा हे फक्त कारण आहे. तुम्ही मनात आणलं तर कोणत्याही समस्येवर मात करू शकता. याचेच एक उदाहरण सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही गोष्ट २०१८ मधील आहे. या मारवाडी जोडप्याच्या ट्रांसफॉर्मेशनमुळे लोक चकीत झाले होते. आदित्य आणि गायत्री शर्मा हे दोघे आपल्या शरीरयष्टीमुळे अजिबात खूश नव्हते. म्हणून त्या दोघांनीही फीट होण्याचा विचार केला.
यादरम्यान दोघांच्या मार्गात अनेक अडथळे आले. पण त्या दोघांनीही कधीही हार मानली नाही. दोघांनीही वर्कआऊट करून आहारावर नियंत्रण ठेवून स्वतःला फीट ठेवण्याचा विचार केला. त्यावेळी आदित्य यांचे वजन ७२ किलो होतं. तर त्यांच्या पत्नीचे वजन ६२ किलो होते.
आज हे दोघंही अनेक कपल्ससाठी आदर्श ठरले आहेत. आदित्य शर्मा या नावानं ते इस्टाग्रामवर एक्टीव्ह आहेत. त्यांनी या अकाऊंटवरून स्वतःचे आणि पत्नीचे ट्रांसफॉर्मेशनचे फोटो शेअर केले आहेत.
या प्लॅटफॉर्मवर त्यांना दोन हजारांपेक्षा जास्त लोकांनी फॉलो केलं आहे. ट्रांसफॉर्मेशनसाठी या दोघांनी बरंच वजन कमी केलं आहे. अनेक महिने मेहनत केल्यानंतर आदित्यनं २० किलो वजन कमी केलं आहे. त्यानंतर ते खूप आकर्षक आणि सुंदर दिसू लागले. आदित्यनं परफेक्ट लूक मिळवण्यासाठी आपल्या पत्नीकडूनही खूप मेहनत करून घेतली.
जाडेपणाला कंटाळून सोडून गेला पहिला बॉयफ्रेंड; अन् आता नवा पाहून सगळ्यांचीच उडाली झोप
हे जोडपं दोन मुलांचे पालक सुद्धा आहेत. घर कुटुंब सांभाळताना गायत्री याांनी व्यायामासाठी वेळ काढला आणि ३ महिन्यात ११ किलो वजन कमी केलं. आता त्यांची कंबर फक्त २५ इंचाची आहे. सध्या हे दोघेही प्रोफेशनल न्यूट्रिशियन कंसलटंट असून ऑनलाईन क्लासेस घेत आहेत. या जोडप्यानं अनेकांची मदत सुद्धा केली आहे. तर लठ्ठपणाने ग्रासलेल्या लोकांसाठी प्रेरणादायक ठरले आहेत. माणुसकीला सलाम! रस्त्यावर स्टॉल लावून भुकेलेल्यांना मोफत अन्न पुरवणारी 'ती' अन्नदाता